न्यायालयातील कामकाज पहाणार्‍या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण न्यायालयाच्या आवारातच करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

न्यायालयातील कामकाज पहाणार्‍या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण न्यायालयाच्या आवारातच करा

 न्यायालयातील कामकाज पहाणार्‍या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण न्यायालयाच्या आवारातच करा

नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले यांचे आवाहन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा न्यायालयात कामकाज पहाणार्‍या न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी वकील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण न्यायालयाच्या आवारातच करण्यात यावे अशी मागणी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की  नेवासा येथील न्यायालयाचे कामकाज नियमीतपणे दि.7 जून 2021 रोजी पासून सुरू होणार आहे.तसेच सदरचे कामकाज चालु झाल्यानंतर कोर्टात सर्व पक्षकार हजर राहणार आहे व सर्व पक्षकार हे वेगवेगळया गावातून येणार असून तसेच वकिलांना,न्यायाधिश यांच्यासह  सर्व कर्मचारी यांना सर्व पक्षकार सोबत संपर्क होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढणार आहे.त्यामुळे वर विषयात नमुद केल्या प्रमाणे न्यायाधिश यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व नेवासा वकिल संघातील सर्व वकिल बांधव व त्यांचे कारकुन यांचे सर्व कुटूंबासमवेत नेवासा न्यायालयाचे आवारात कोव्हीड 19 ची लसीकरण करणे गरजेचे व आवश्यक झालेले आहे त्यामुळे कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही.
वरील विषयासंदर्भात कोव्हीड-19 चे लसीकरण हे नेवासा न्यायालयाच्या आवारात दि.7 जून 2021 रोजीचे पूर्वी करुन घेणे आवश्यक व गरजेचे असल्याने ते लसीकरण करण्यात यावे अशी मागणी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले यांनी केली आहे.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देतेवेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव नवले यांच्यासह अँड अशोक करडक,अँड.बन्सीभाऊ सातपुते, अँड.रमेश पाठे,अँड.ज्ञानदेव जाधव,अँड.राजू इनामदार, ड.संभाजी काळे,ड.प्रशांत माकोणे,ड. वैभव वाकचौरे, ड सुदाम ठुबे,अँड जमीर शेख,अँड सुनिल अल्लाट उपस्थित होते.

No comments:

Post a Comment