‘अ‍ॅप’द्वारे गुन्हेगारांवर ‘वॉच’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

‘अ‍ॅप’द्वारे गुन्हेगारांवर ‘वॉच’

 ‘अ‍ॅप’द्वारे गुन्हेगारांवर ‘वॉच’

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अ‍ॅप द्वारे शोधले गुन्हेगारांचं घर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनाची चिंता वाढविणारी असल्यामुळे गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला असून सी एम आय एस च्या माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे प्रात्यक्षिक घेऊन भिंगार कॅम्प परिसरातील एका गुन्हेगाराचा पत्ता या अँपद्वारे शोधण्यात आला. याद्वारे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी पोलिस प्रशासनात हिस्ट्री शीट तयार केले जात होते. तसाच हा अँपचा विषय आहे. बाहेरुन आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना आरोपी किंवा गुन्हेगार यांचे रेकॉर्डवरील पत्ते शोधता यावेत हा यामागचा उद्देश आहे सदरचे प सध्या ट्रायल ड्रेस वरती असून त्याचे प्रात्यक्षिक घेऊन आणखी काय करता येईल काय अडचणी येत आहेत याची माहिती घेतली जात आहे सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर हे प पोलीस विभागातील सर्व कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी या अगोदर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी धडक कारवाई यापूर्वी हाती घेतली होती. आतापर्यंत तीन ते चार टोळ्यावर मोक्काअंतर्गत कारवाई त्यांनी केलेली होती. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या आरोपींनी दोन पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत त्यांचे नाव टू प्लस यादीमध्ये जोडले जाणार आहेत. त्या उद्देशाने नगर जिल्ह्यामध्ये टू प्लस यादी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये टू प्लस मध्ये अनेक आरोपींचा समावेश झालेला आहे. त्या आरोपींचे घर नेमके कुठे आहे, आरोपी जर घरीच असतील तर त्यांच्यावर वॉच ठेवला गेला पाहिजे, त्यांच्या घराची सुद्धा तपासणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे, त्या करता संबंधित पच्या माध्यमातून आता या आरोपींच्या घराचा तपास अत्यंत सहज गतीने होऊ शकणार आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे टू प्लस मध्ये आरोपी आहेत त्यांचा तात्काळ शोध लागला पाहिजे तसेच जे सराईत गुन्हेगार आहेत अशांची सुद्धा नावे या यादीमध्ये टाकली जाणार आहे आता याप व गुगलच्या माध्यमातून त्यांचा तात्काळ शोध घेतला जाणार आहे. या उद्देशाने हे प तयार करण्यात आलेले आहे. या अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे अँप अधीक्षक पाटील यांनी तयार केले होते. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करून ते आता नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत केले जाणार आहे. हेे अँप प्रायोगिक तत्वावर तयार झाले असून आज जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी भिंगार कॅम्प हद्दीमध्ये संबंधित आरोपींचा तपास कशा पद्धतीने लावायचा याकरता डेमो म्हणजेच प्रात्यक्षिक केले आहे. सात पथके वेगवेगळ्या प्रकारे पाठवून त्या आरोपींच्या घरापर्यंत पोहोचता येते की नाही याची माहिती त्यांनी घेतली.

No comments:

Post a Comment