पारनेर मध्ये १ कोटी १० लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

पारनेर मध्ये १ कोटी १० लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

 पारनेर मध्ये १ कोटी १० लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

बुगेवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ!



नगरी दवंडी 

पारनेर -प्रतिनिधी

 ‌जिल्हा परिषद किंवा १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तीन लाख रुपयांची कामे मंजूर करून आणायची. लाख रुपयांच्या विकास कामाच्या नावाखाली हातभर भाषणे‌ ठोकायची हे हे काम विरोधक करत आहेत.त्यामुळे विकासाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली असून भाषणे ठोकण्या पेक्षा आपला तालुक्यातील विकास कामांवर भर असल्याची टिका विरोधकांवर  राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या हस्ते तराळवाडी बुगेवाडी सोबलेवाडी महाजन मळा या ठिकाणी जवळपास १ कोटी १० लाख रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.या कामांमध्ये तराळवाडी ते लोणी मोरीपुल १२.४५ महाजन मळा मोरी पुल ९.८५ तर  बुगेवाडी रस्ता ३७ लाख बुगेवाडी ते सोंडवस्ती दरा २७ लक्ष बुगेवाडी स्मशानभूमी १७ लाख ५० हजार बुगेवाडी श्रीराम मंदिर शौचालय ७ लक्ष दोन हायमॅक्स या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा करण्यात आला आहे.

  उद्योजक विजय औटी डॉ बाळासाहेब कावरे राजेश चेडे आनंदा औटी डॉ मुदस्सर सय्यद दत्तात्रय कुलट उद्योजक सहदेव तराळ दिनेश औटी साहेबराव देशमाने विलास तराळ   बाळासाहेब नगरे सुभाष शिंदे संदिप थोरात कोंडिभाऊ थोरात सोपान बुगे दगडू कावरे संदिप काळे संपत वारे सुप्रिया शिंदे कल्पनाताई औटी मंगल वारे सुवर्णा बूगे शारदा थोरात अर्चना शिंदे सुनिता कावरे भाऊसाहेब कावरे बाळासाहेब कावरे कैलास चत्तर रामदास थोरात यांच्यासह ग्रामस्थ्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की शहरासह व्यवस्था वरील अनेक प्रश्न प्रलंबित असून शिक्षण आरोग्य वीज रस्ते पाणी यांच्यासह मूलभूत सोयीसुविधा सोडवण्यासाठी भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे

या सरकारच्या माध्यमातून पारनेर तालुक्यामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाली असल्याची ग्वाही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी ग्रामस्थांना दिली आहे. कोरोना काळात निधीची टंचाई असतानाही पारनेर तालुक्याला जास्तीत जास्त झुकते माप देण्याचे आपण प्रयत्न केला आहे. त्यामुळे विकास कामाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील छोटी-मोठी गावे व वाड्या वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे कोण काय करतं यापेक्षा आपल्याला किती काम करता येईल विकासकामांसाठी किती निधी आणता येईल यावर आपला भर असून जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले.

 बुगेवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी   विजय औटी डॉ बाळासाहेब कावरे राजेश चेडे आनंदा औटी डॉ मुदस्सर सय्यद दत्तात्रय कुलट उद्योजक सहदेव तराळ दिनेश औटी साहेबराव देशमाने विलास तराळ   बाळासाहेब नगरे सुभाष शिंदे .

No comments:

Post a Comment