नगरचा ऐतिहासिक दस्तएैवज जतन करणार- रविंद्र बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

नगरचा ऐतिहासिक दस्तएैवज जतन करणार- रविंद्र बारस्कर

 नगरचा ऐतिहासिक दस्तएैवज जतन करणार- रविंद्र बारस्कर

आधुनिक तंत्रज्ञानाची होणार मदत...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराला 531 वर्षांची ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक अशी उज्ज्वल परंपरा आहे या शहराचा ऐतिहासिक दस्तऐवज, महत्वपूर्ण लिखित माहिती,नकाशे,तसेच जतन करून ठेवलेले मोडी भाषेतील माहिती, यासह  महत्वपूर्ण अभिलेख आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अबाधित राहावे या हेतूने अहमदनगर महानगरपालिका सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी इतिहास तज्ञ भूषण देशमुख, सहाय्यक आयुक्त दिनेश सिनारे, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, माहिती सुविधा विभाग प्रमुख विजय बालानी, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांच्या सह महापालिका रेकॉर्ड विभागाची पाहाणी केली. रेकॉर्ड विभाग प्रमुख विजय ढवळे यांनी संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून दिले व माहिती दिली. याप्रसंगी रवींद्र बारस्कर म्हणाले की आपल्या शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे.ती जतन झाली पाहिजे येणार्‍या पिढीला आपल्या शहराचा इतिहास माहीत असणे गरजेचे असून आपल्या शहरावर प्रत्येकाने प्रेम करावे यातून सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते.नगरपालिकेची स्थापना 1954 मध्ये झाली. दीडशे वर्षांनंतर 2003 मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली. सुदैवाने जुन्या काळातील अनेक दस्तऐवज महापालिकेच्या जुन्या वास्तूत आहेत. तिथल्या उंच फडताळात लाल कापडात गुंडाळून जुन्या फाईली, रजिस्टर ठेवण्यात आली आहेत. जर दुर्दैवाने विजेचे शॉर्ट सर्किट झाले तर हा अनमोल ऐतिहासिक ठेवा कौन्सिल हॉल सारखा नष्ट होऊ शकतो.
उपलब्ध अभिलेख जतन करण्यासाठी आधुनिक तंत्राची मदत घेऊन सर्व कागदपत्रे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्कॅनिंग करून आपला वारसा, इतिहास, लिखित स्वरूपातील दस्तऐवज जतन करता येईल. यासाठी शहरातील इतिहास तज्ञ, साहित्यिक, कलाकार, जेष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची समिती तयार करून या महत्त्वपूर्ण कामाला गती देण्यात येणार आहे.यावेळी सर्वश्री बाबासाहेब भिंगारदिवे, दीपक भागवत, आप्पासाहेब  बेलदार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment