चोरीचा डंपर सापडला. 1 आरोपी गजाआड, 1 फरार, 1 जेलमध्ये. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

चोरीचा डंपर सापडला. 1 आरोपी गजाआड, 1 फरार, 1 जेलमध्ये.

 चोरीचा डंपर सापडला. 1 आरोपी गजाआड, 1 फरार, 1 जेलमध्ये.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तीन वर्षांपूर्वी चोरी गेलेला डंपर व डंपर चोरणारा शिंगवे नाईक येथील जावेद सय्यद यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील आणखी एक आरोपी संदीप वाखुरे रा. बाभूळगाव फरार असून तिसरा आरोपी गणेश जाधव हा पाथर्डी जेलमध्ये असल्याचे माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सदर घटनेची हकीकत अशी की, याबाबत मिळालेली माहिती अशी की  25 नोव्हेंबर 2018 रोजीचे रात्री  अजिंक्य बबन पवार, वय 24 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, भिंगार, अ.नगर हे त्यांचे मालकीचा 6,00,000/- रु. किं. चा टाटा कंपनीचे डंपर नं. एमएच 16 एवाय 0890 हा नगर-सोलापूर रोडवरील रणसिंग यांचे गोडावून जवळ उभा करुन घरी गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदरचा डंपर चोरुन नेला होता. या घटनेबाबत भिंगार कॅम्प पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोनि / अनिल कटके यांना माहिती मिळाली कि, गुन्ह्यातील चोरीस गेलेला डंपर शिंगवे नाईक येथे राहणारा जावेद सय्यद याचेकडे असून तो डंपरचा विना नंबरचा वापर करीत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, मच्छिन्द्र बर्ड, संदीप दरंदले यांनी जावेद बिबन सय्यद, वय - 32 वर्षे, रा. शिंगवे नाईक, यांस ताब्यात घेतले. असता त्याने त्याचे राहते घराचे बाजूला उभा करुन ठेवलेला 6,00,000/-रु. किं. चा विना क्रमांकाचा, टाटा कंपणीचा, 1613 मॉडेलचा डंपर समक्ष हजर केल्याने सदर डंपरची पाहणी केली असता तो गुन्ह्यातील चोरीस गेलेला डंपर असल्याची खात्री झाल्याने तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
आरोपी जावेद बिबन सय्यद याचेकडे डंपर बाबत अधिक चौकशी केली असता त्याने डंपर हा संदीप वाखुरे, रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी व गणेश जाधव, रा. पाथर्डी यांचेकडून विकत घेतला असल्याची माहिती दिल्याने आरोपी संदीप वाखुरे व गणेश जाधव यांचा पाथर्डी येथे जावून शोध घेतला असता आरोपी संदीप वाखुरे हा मिळून आला नाही. आरोपी गणेश जाधव हा पाथर्डी पो.स्टे. मध्ये एका गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे. जावेद बिबन सय्यद यास मुद्देमालासह भिंगार कॅम्प पो.स्टे. ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पो.स्टे. करीत आहेत.
ही कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कूमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, विशाल दुमे उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment