रिता भाकरेंची महापौरपदाच्या शर्यतीतून माघार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

रिता भाकरेंची महापौरपदाच्या शर्यतीतून माघार.

 रिता भाकरेंची महापौरपदाच्या शर्यतीतून माघार.

रोहिणी शेंडगेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आगामी महापौर निवडणुकीस सामोरं जात असताना शिवसेनेकडून दोन उमेदवार इच्छुक असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असून पक्षातच दोन गट निर्माण झाले असल्याची भावना महापौर पद प्राप्त करण्यासाठी अडचणीचे ठरेल अशी खंत राज्यस्तरीय नेत्यांनी व्यक्त केल्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक रिता भाकरे यांनी महापौरपदासाठी इच्छुक नसल्याचे पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले असून आता शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या एकमेव उमेदवार राहणार आहेत.
सर्वाधिक 23 नगरसेवक असलेल्या शिवसेनेने आगामी महापौर पदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी महापौर पद राखीव आहे. शिवसेनेत या प्रवर्गातील सर्वाधिक तीन उमेदवार असल्याने महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. यात गटनेत्या रोहिणी शेंडगे व नगरसेविका रिता भाकरे यांची नावे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकजुटीचा निर्धार केला होता. उमेदवारीसाठी प्रस्तावित दोन्हीं नावाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
नगरसेविका भाकरे यांच्या दाव्यामुळे पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र त्यांच्या माघारीमुळे पक्षातील नगरसेवक महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्याचे चित्र आहे.भाकरे यांच्या बिनशर्त माघारीच्या निर्णयाबाबत नगरसेवकांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान भाकरे यांच्या माघारीमुळे शिवसेनेकडून गटनेत्या शेंडगे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. आता निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का याकडे मनपातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment