मुकुंदनगर कायम दुर्लक्षित मनपा प्रशासन व सत्ताधार्‍यांकडून... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

मुकुंदनगर कायम दुर्लक्षित मनपा प्रशासन व सत्ताधार्‍यांकडून...

मुकुंदनगर कायम दुर्लक्षित मनपा प्रशासन व सत्ताधार्‍यांकडून...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सततचा अपुरा पाणीपुरवठा, अमृत भुयारी गटार योजनेतून वगळणं, पथदिवे रस्त्यांची कामे याबाबत मनपा प्रशासन व सत्ताधारी सतत मुकुंद नगरला दुर्लक्षित करत असल्याचा आरोप नगरसेवक आसिफ सुलतान यांनी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केला आहे.
महापौर व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आसिफ सुलतान यांनी म्हटले आहे की, वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करून देखील अद्यापही फेस टू चे काम पूर्ण झालेले नाही. मोठी मशीद पासून खालच्या भागात दर्गा दारापर्यंत पाणीपुरवठा 3 ते 5 दिवसा नंतर होत आह.े नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागते.ज्याप्रमाणे इतर उपनगरांमध्ये प्राधान्य देऊन फेस टू लाईनचे काम पूर्ण करण्यात आले तसेच मुकुंदनगर चे काम पूर्ण करण्यात यावे व प्रभागातील पाण्याची समस्या सोडवण्यात यावी. तसेच ड्रेनेज व गटारीची समस्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. त्या ठिकाणी जुन्या लाईन चोकप होऊन मैलामिश्रित पाणी वाहत असते. अनेक ठिकाणी चेंबर खचले आहे. सफाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. अमृत भुयारी गटार योजनेचे काम शहरात सुरू आहे, तर दुसर्‍या टप्प्याचे प्रस्ताव सर्व उपनगरासाठी केंद्र शासनाला प्रशासन पाठवीत आहे परंतु त्यामध्ये मुकुंद नगरला या योजनेतून वगळले आहे
मुकुंदनगरची 35 ते 40 हजार लोकसंख्या असून सुद्धा प्रशासनाने मुकुंदनगरला का या योजनेतून वगळले समजणे पलीकडे आहे. प्र. क्र. 3 व 4 मुकुंदनगर गोविंदपुरा भागाला ही अमृत भुयारी गटार योजनेचे समाविष्ट करावे. जेणेकरून ड्रेनेजची समस्या सोडविण्यात येईल व प्रभागांमध्ये मेन रोड व अंतर्गत भागात पथदिवे बंद आहे. साहित्य उपलब्ध नाही. अंधारामुळे अपघात होत आहे. पावसाळ्यामुळे अंधारात चालणे कठीण झाले आहे. मोकाट कुत्रे अंधारात हल्ला करतात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी बंद पथदिवे त्वरित दुरुस्त करावे व प्रभागातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे .
मागील वर्षी रस्ते पॅचिग करताना मुकुंदनगर भागाला डावलण्यात आले. मोठी मज्जिद ते दर्गा दायरा भागातील 80 टक्के रस्त्याची कामे करण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यामुळे रस्ते अजून खराब होणार आहे. तरी त्यासाठी उपाययोजना करून मुरूम व खडी टाकण्यात यावे व रस्त्याची पॅचिग करण्यात यावे या मागणीसाठी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील मागणी केली आहे. परंतु प्र. क्र.3 मुकुंदनगर भागाला सापत्नी वागणूक दिली जाते असे आरोप करण्यात आले व प्रभागातील सर्व समस्या सोडविण्याकरिता उपाय योजना करण्यात तसेच संबंधितांना आदेश द्यावे. अन्यथा नागरिकांसमवेत लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment