जिल्हा वाचनालय वाचकांसाठी सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

जिल्हा वाचनालय वाचकांसाठी सुरू

 जिल्हा वाचनालय वाचकांसाठी सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः रसिक वाचकांसाठी अहमदनगर जिल्हा वाचनालय पुन्हा सुरु झाले आहे. कोविडच्या पार्श्वभुमिवर एप्रिल व मे महिन्यांमध्ये बंद नंतर वाचकांसाठी वाचनालय पुन्हा सुरु झाल्याची माहिती अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक  व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.
जिल्हा वाचनालय, चितळेरोड व सावेडी वाचनालयाचे सर्व विभाग सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 व संध्याकाळी 4.30 ते रात्री 8 पर्यंत खुले राहिल. कोरोनाचे सर्व नियम पाळून व सॅनिटाईझ करुन ही पुस्तके वाचकांना उपलब्ध केली जाणार आहेत.
रसिक वाचक, सभासदांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, अजित रेखी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment