वृक्षारोपणाने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा वाढदिवस साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

वृक्षारोपणाने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा वाढदिवस साजरा

 वृक्षारोपणाने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा वाढदिवस साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  वृक्षारोपण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. समाजात पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे.कोरोनाच्या संकटकाळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे त्यामुळे पुढील काळामध्ये वृक्षारोपणाने वाढदिवस साजरे केले पाहिजे असे प्रतिपादन जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी व्यक्त केले.
    विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनधारा प्रतिष्ठानने रेणुकानगर बोल्हेगाव परिसरामध्ये 100 वृक्ष लावून संवर्धनाचा संकल्प केला आहे यावेळी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, अध्यक्ष अमोल लगड,दिनेश सावंत, सुरज धिवर,सोमनाथ देवकाते, महेश म्हस्के, अतीक शेख,सिद्दिक शेख,दिनेश खेडकर, कृष्णा यादव तसेच प्रतिष्ठानचे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता संपत बारस्कर म्हणाले की, पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, नुसते झाड लावून चालणार नाही तर त्याचे संगोपनही करणे गरजेचे आहे. जीवनधारा प्रतिष्ठानने वृक्षारोपणाचा संकल्प हाती घेतला आहे हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे ती म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here