उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने वाहने सावकाश व जपून चालवावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने वाहने सावकाश व जपून चालवावे

 उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने वाहने सावकाश व जपून चालवावे

चंद्रकांत उजागरेंचे आवाहन  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरात सक्कर चौक ते स्टेट बँक चौक नगर-पुणे महामार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. जे काम चालू आहे त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी जागा आहे. मात्र ही जागा कमी रुंदीची असल्याने व रस्त्यावर खड्डे देखील जास्त प्रमाणात झालेले आहे. संपूर्ण रस्त्यावर पावसाने चिखल साचले आहेत. कृपया या रस्त्याने जाताना व येताना कोणीही मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करू नका व गाडीचा वेग कमी ठेवा. कारण गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर नियमित वाहन घसरणे, रुतणे, पडल्यामुळे मार लागणे या घटना घडत आहेत. नुकतेच या रस्त्यावर एका तरुण व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
   या करिता पुन्हा एकदा विनंती की या रस्त्याने जपून गाडी चालवा किंवा शक्य असल्यास हा रस्ता किमान दुचाकीसाठी तरी नागरिकांनी बंद ठेवावा जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नसल्याचे चंद्रकांत उजागरे यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment