भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का नाही? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का नाही?

 भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का नाही?

सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर यांचा ग्रामस्थांच्यावतीने आ. लंके यांना प्रश्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील निघोज येथे दुष्काळी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या एमपीएससीच्या अभ्यासिकेसाठी आमदार निलेश लंके यांनी एक कोटीचा निधी आनल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करुन, या अभ्यासिकेसाठी भाळवणी गाव का सुचवले नसल्याचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात भाळवणीचे कोविड सेंटर संपुर्ण देशात व परदेशात गाजले. भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का होऊ शकत नाही?, असा थेट सवाल त्यांनी आमदार लंके यांना प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
भाळवणी हे गाव नगर-कल्याण महामार्गावर सोयीच्या ठिकाणी आहे. आमदार लंके यांनी भाळवणीत कोरोना काळात उभारलेल्या कोविड सेंटरच्या माध्यमातून गावाचे नांव जगाच्या कानाकोपर्यात नेले. कोविड सेंटरच्या माध्यमातून जनसेवा केली. याच गावात एमपीएससीची अभ्यासिका झाली असती तर, गावाचे नांव आनखी उंचावले असते. या बाबत विचार करुन एमपीएससीच्या अभ्यासिका भाळवणीत उभारण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment