नेवाशात मास्क न घालणार्‍या नागरिकांसह व्यापार्‍यांवर मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांची दंडात्मक कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

नेवाशात मास्क न घालणार्‍या नागरिकांसह व्यापार्‍यांवर मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांची दंडात्मक कारवाई

 नेवाशात मास्क न घालणार्‍या नागरिकांसह व्यापार्‍यांवर मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांची दंडात्मक कारवाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा शहरात मास्क न घालणार्‍या नागरिकांसह व्यापार्‍यांवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या नेतृत्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.या कारवाईसाठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्यासह नगरपंचायतचे कार्यालयीन कर्मचारी ही सहभागी झाले होते. अजून कोरोना गेलेला नाही नियमांचे पालन करा असे आवाहन ही नगरपंचायतच्या टीमकडून करण्यात येत होते.
         मास्क नसणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिकारी गुप्ता,वाघमारे, कडपे,कार्यालयीन कर्मचारी मनिषा मापारी,अनिता सोनवणे यांच्यासह कर्मचार्‍यांनी नेवासा शहरात फेरफटका मारून ही कारवाई केली.
नेवासा शहरात बाहेर गावाहून येणार्‍या नागरिकांसह व्यवसाय करणार्‍या काही लोकांना देखील मास्क नसतो हे निदर्शनास आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा शहरात वाढू नये म्हणून  सायंकाळच्या सुमारास नगरपंचायत ही टीम नेवासा शहरातील मुख्य पेठेसह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड,नगरपंचायत चौक, बाजारतळ परिसर,एस.टी. स्टँड परिसर श्रीरामपूर रोड याठिकाणी फेरफटका मारून मास्क न घालणार्‍या व्यक्तींवर तसेच दुकानातील काही व्यापार्‍यांवर देखील ही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
कोरोनाचा आकडा नेवासा शहरासह तालुक्यात कमी होत असला तरी खरेदीसाठी येणार्‍या बाहेरील लोकांची संख्या अधिक असल्याने मास्क न घालणार्‍यावर ही कार्यवाही करण्यात आली व दररोज याच पद्धतीने फेरफटका मारुन ही दंडात्मक कारवाई आम्ही करतच रहाणार असून नागरिकांना कोरोनाच्या या महामारीत प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क घालूनच कामासाठी बाहेर पडावे शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here