कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ः तनपुरे

 कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ः तनपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी द्यावी. अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांना पत्रान्वये केली.
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना पाठविलेल्या पत्रात श्री तनपुरे यांनी म्हटले की राज्यातील शेतकर्‍यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना शासनाने जाहीर केली. यासाठी मोठा निधीही उपलब्ध करण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे. तसेच नवीन कर्ज घेण्यासाठी ही ते पात्र ठरले आहे. ही शेतकर्‍यांसाठी मोठी पर्वणीच ठरली परंतु राज्यातील या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची संख्याही मोठी आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता आजही जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 186 शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने ज्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी बाबतची सर्व माहिती शासनास सादर केलेली आहे यासाठी 63 कोटी 85 लाख रुपये शासनाकडून जिल्हा बँकेत आता होणे आवश्यक आहे. ही रक्कम शासनाकडून अदा न झाल्यामुळे शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन कर्जमाफीसाठी देय असलेली रक्कम तातडीने अदा करण्याबाबत उचित कार्यवाही चे आदेश द्यावेत असे अर्थ मंत्री अजीत पवार यांना पाठवलेल्या पत्रात तनपुरे यांनी नमूद केलेले आहे.

No comments:

Post a Comment