कोरोना मुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 23, 2021

कोरोना मुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का?

 कोरोना मुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शालेय शिक्षण विभागास पडताळणी करण्याची सूचना.


मुंबई -
राज्यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का? याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील 10 वी तसेच 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च सरकारमार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणार्‍या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्याची सूचना केली. बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या 12 वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून 12 वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली
  


ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यातून मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देऊन व्यक्त केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हिवरे बाजार हे राज्यातील पहिले गाव कोरोनामुक्त झाले आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर 15 जून 2021 पासून 5 वी ते 10 वी चे वर्ग सुरू केले होते परंतु शिक्षण विभागाने या शाळा बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे पवारांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here