ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 23, 2021

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढले.

 ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढले.

नगर शहराला दिलासा पण..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मनपा हद्दीत गेल्या 24 तासात केवळ 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ही दिलासादायक बाब असली तरी ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात 24 तासात 404 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याची आवश्यकता आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 36, अकोले - 12, राहुरी - 13, श्रीरामपूर - 9, नगर शहर मनपा - 8, पारनेर - 90, पाथर्डी - 52, नगर ग्रामीण - 21, नेवासा - 31, कर्जत - 7, राहाता - 22, श्रीगोंदा - 32, कोपरगाव - 10, शेवगाव - 30, जामखेड - 15, भिंगार छावणी मंडळ - 0, इतर जिल्हा - 7, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 36, खासगी प्रयोगशाळेत 163 तर अँटीजेन चाचणीत एकूण 205 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment