हनी ट्रॅप. 3 आरोपीं विरुद्ध दोषारोपपत्र दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

हनी ट्रॅप. 3 आरोपीं विरुद्ध दोषारोपपत्र दाखल.

 हनी ट्रॅप. 3 आरोपीं विरुद्ध दोषारोपपत्र दाखल.

बागायतदाराला ओढले प्रेमाच्या जाळ्यात..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जखणगाव येथील तरुणीने बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सोन्याची चैन, अंगठी, रोख लाखों रुपये लुटून 1 कोटींची खंडणी मागणार्‍या महिलेसह अन्य 2 आरोपींविरुद्ध न्यायालयात 82 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी न्यायालयात दाखल केले आहे.
हनीट्रॅप करणार्‍या टोळीतील पहिल्या गुन्ह्याचे संबंधीत तरूणीसह तिचा पंटर अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर), बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) या तिघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
जखणगावच्या तरूणीने एका बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्या बागायतदाराला 26 एप्रिल रोजी घरी बोलवून त्याच्या सोबत नाजूक संबंध ठेवले. त्यावेळी तरूणीच्या साथीदारांनी व्हिडिओ चित्रिकरण केले. त्यानंतर सदर बागतदाराला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, सोन्याच्या चार अंगठ्या, 84 हजार 300 रुपये रोख असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. तसेच त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. बागतदाराने हिमंत दाखवित सदर तरूणीसह तिच्या पंटरविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर एका क्लासवन अधिकार्‍यानेही हनीट्रॅप टोळीविरोधात फिर्याद दिली आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करत पोलिसांनी एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र तयार केले. शरीर सुखाचे अमिष दाखवून खंडणी मागणे, मारहाण, जबरी चोरी या कलमातंर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला आहे. यामध्ये एकुण 10 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून काहींचे 164 नुसार जबाब घेतले आहे. निरीक्षक सानप यांनी हे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here