हत्या पैशासाठीच! दोषारोप पत्र दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 10, 2021

हत्या पैशासाठीच! दोषारोप पत्र दाखल.

 हत्या पैशासाठीच! दोषारोप पत्र दाखल.

व्यापारी गौतम हिरण हत्याकांड. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी शोधले गुन्हेगार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्याप्रकरणाची जिल्ह्यात चर्चा असतानाच श्रीरामपुर मधील व्यापारी गौतम हिरण यांची अपहरण करून हत्या झाल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य शासनावर ताशेरे ओढत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग केल्यानंतर मिटके यांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या पाचही आरोपींविरुद्ध 505 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून हिरण यांची हत्या ही केवळ पैशासाठी झाली असल्याचा निष्कर्ष दोषारोपपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील रेखा जरे हत्या प्रकरण त्यापाठोपाठ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरण यांची झालेली हत्या यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन पोलीस प्रशासनावर कठोर प्रहार केले असतानाच 7 मार्च 2021 रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणामुळे जैन समाजात मोठा असंतोष पसरू लागल्यामुळे श्रीरामपूर पोलिसांना आव्हान ठरलेल्या या प्रकरणाचा तपास संदीप मिटके यांच्याकडे दिल्यानंतर मिटके यांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज,गुन्ह्यात वापरण्यात आलेली ओमनी कार, पल्सर मोटरसायकलच्या आधारावर गुन्हातील आरोपींचा शोध घेवून अटक केली
27 फेब्रुवारीला ढग्याचा डोंगर ता सिन्नर येथे सदर गुन्ह्यातील  आरोपींनी एकत्र येऊन मयत गौतम झुंबरलाल  हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम बळजबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता. गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार, पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासण्यात आले व एकूण 505 पानाचे सबळ पुराव्यासह आरोपी - अजय राजू चव्हाण वय 26 वर्ष, नवनाथ धोंडू निकम वय 23 वर्ष, आकाश प्रकाश खाडे वय 22 वर्ष, संदीप मुरलीधर  हळडे वय 26 वर्ष, जुनेद/जावेद बाबू शेख वय 25 वर्ष, यांचे विरुद्ध  डीवायएसपी संदीप मिटके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here