ओबीसींचाही मोर्चा, 15 जुनला राज्यव्यापी आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

ओबीसींचाही मोर्चा, 15 जुनला राज्यव्यापी आंदोलन

 ओबीसींचाही मोर्चा, 15 जुनला राज्यव्यापी आंदोलन

मुंबई ः खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिलेली असतानाच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शेंडगे यांनी मोर्चाची हाक दिल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा केली. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. एक डेडिटकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करावा. त्यानंतर हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही तर येत्या 15 तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल. याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

No comments:

Post a Comment