लसीचे दर केंद्राकडून जाहीर खासगी रुग्णालयांना 150 रु. सेवाशुल्क बंधनकारक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

लसीचे दर केंद्राकडून जाहीर खासगी रुग्णालयांना 150 रु. सेवाशुल्क बंधनकारक

 लसीचे दर केंद्राकडून जाहीर खासगी रुग्णालयांना 150 रु. सेवाशुल्क बंधनकारक


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जोरदार तडाखा दिल्याने भारत सरकारने लसीकरण मोहिमेला प्राधान्य दिले आहे. 21 जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. सरकारी लसीकरण केंद्रासह खासगी दवाखान्यांमध्येही लस उपलब्ध असणार आहे. नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना व्हायरस लसीचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. नवीन दरानुसार कोविशिल्डची किंमत 780 रुपये (600 रुपये लशीची किंमत + 5 टक्के जीएसटी + 150 सेवा शुल्क) प्रति डोस असेल.तर कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस 1410 रुपये (1200 रुपये लशीची किंमत + 5 टक्के जीएसटी + 150 सेवा शुल्क) असेल. खासगी रुग्णालयांसाठी रशियन निर्मित स्पुतनिक-व्हीची किंमत 1145 रुपये (948 रुपये लशीची किंमत + 5 टक्के जीएसटी + 150 सेवा शुल्क) असणार आहे.

No comments:

Post a Comment