पेट्रोल-डिझेल दरातवाढीचा जाळ; 37 दिवसांत 5.15 महागलं.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

पेट्रोल-डिझेल दरातवाढीचा जाळ; 37 दिवसांत 5.15 महागलं..

 पेट्रोल-डिझेल दरातवाढीचा जाळ; 37 दिवसांत 5.15 महागलं..


मुंबई ः देशातील वेगवेगळ्या भागात पेट्रोलने ऐतिहासिक उंची गाठली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि लडाखसह सहा राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात 100 रुपये प्रती लीटर पेट्रोल झाले आहे. तेथेच मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून आताचा दर 101 रुपये आहे. देशात राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलकरता सर्वाधिक वॅट आकारला जातो. यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगान यांचा नंबर येतो. मुंबई देशातील पहिलं महानगर आहे जेथे 29 मे रोजी पेट्रोलचा दर हा 100 रुपये प्रती लीटरवर पोहोचला आहे. मुंबईत यावेळी पेट्रोलचा दर हा 101.71 रुपये आणि डिझेल 93.77 रुपये प्रती लीटर आहे. यावर्षी चार मे नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 वेळा वाढ झाली आहे. या दरम्यान पेट्रोलचे दर 5.15 रुपये आणि डिझेव 5.74 रुपये प्रती लीटरने वाढलं आहे. तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत दर वाढले आहे.

No comments:

Post a Comment