उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आहवानानंतर राज्यातील कानाकोपरातुन आमदार लंकेच्या महाकोव्हिड सेंटरला मदतीचा ओघ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आहवानानंतर राज्यातील कानाकोपरातुन आमदार लंकेच्या महाकोव्हिड सेंटरला मदतीचा ओघ

 उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आहवानानंतर राज्यातील कानाकोपरातुन आमदार लंकेच्या महाकोव्हिड सेंटरला मदतीचा ओघ

१५ ते १६ जिल्ह्यातून वस्तू व औषधांची मदतनगरी दवंडी

पारनेर -प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोन दिवसापूर्वी पुणे येथे कोरोना बैठकीसाठी आले असताना एका दिव्यांगाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरसाठी २१०० रुपयाची मदत ना.पवार यांना धनादेशाद्वारे दिली होती. याची दखल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः जबाबदारी घेऊन यासंबंधी आमदार निलेश लंके यांची फोनवरून चर्चा करत ही मदत पोहोचवण्याचे आश्वासन सुद्धा त्या दिव्यांग कार्यकर्त्यांना दिले होते.निलेश तुझे काम चांगले असून तुझ्या कोव्हिड सेंटरची चर्चा राज्यभर आहे. त्यामुळे हे काम असेच पुढे चालू ठेव असे म्हणत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शाबासकीची थाप आमदार लंकेवर टाकली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभे राहीलेल्या भाळवणी येथील शरद चंद्र पवार महाकोव्हिड सेंटरला जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातील विविध भागातून व कानाकोपऱातुन मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. अनेकांनी आर्थिक व‌ औषधे स्वरूपात व गहु तांदुळ फळे वस्तु रूपाने मदत केली असताना दुसरीकडे गहू असो वा तांदूळ किंवा औषधे त्याचबरोबर सुका मेवा ही या कोरोना बाधित रुग्णांसाठी दान म्हणून पाठवला असून आमदार लंके यांचा कोव्हिड सेंटर पॅटर्न राज्यात बोलबाला असुन राज्याला दिशादर्शक ठरला आहे. तरी या कोव्हिड सेंटर जवळपास‌ ५ हजार च्या वर रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून या कोव्हिड सेंटरची चर्चा राज्यभरात झाली आहे.भाळवणी येथील या कोव्हिड सेंटरला मुंबई धुळे जळगाव सांगली कोल्हापूर सातारा पनवेल कोकण पुणे शेगाव सोलापूर बारामती ठाणे रायगड या १५ ते १६ जिल्ह्यातून अनेक दानशूरांनी गहु ज्वारी तांदूळ भाजीपाला अंडी व ‌विविध प्रकारची फळे या रुग्णांसाठी लागणारी औषधे थेट या कोव्हिड सेंटर मध्ये पोहोच केली आहे. त्यामुळे शरद चंद्र पवार कोव्हिड सेंटरची चर्चा राज्यभरात झाली असून अनेक गोरगरीब व गरजु रुणांनासाठी हे‌ आधार केंद्र बनले आहे.तर दुसरीकडे आमदार लंके यांच्या या कोरोना सेंटर पॅटर्नमुळे राज्यातील अनेक आमदार-खासदारांना सुद्धा आपल्याकडे असे कोव्हिड सेंटर होऊ शकत नाही का असा सवाल करू लागले.

रुग्णांसाठी मटन- चिकनबरोबर फळे आणि ड्रायफ्रूट्स..

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू केले. या कोव्हिड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल होणा-या रुग्णांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांना चिकन मटन बरोबर फळे व ड्रायफ्रुट्स देण्यात येत असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. तर दुसरीकडे या कोव्हिड मधील रुग्णांचा मानसिक ताण हलका व्हावा यासाठी किर्तने प्रवचने भारूडे  व इतर मनोरंजनाची कार्यक्रम सुद्धा आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या कोव्हिड सेंटर मध्ये उपचारा बरोबर मानसिक आधार देण्याचे काम सुद्धा केले जात असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगितले आहे. तसेच नाश्त्यामध्ये पोहे शिरा उपमा अंडी चिकन सूप मटण सूप रुग्णांना दिले जात आहे.

राज्यातील अनेक अराजकीय व सामाजिक संस्थानाही या सेंटरची भुरळ..

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या काळातआमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार कोळी सेंटर सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या कोव्हिड सेंटर मध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा याचा बोलबाला राज्यात झाला असून अनेक सामाजिक व राजकीय संघटना या कोळी सेंटर चा कारभार पाहण्यासाठी राज्यातून येत आहे. तर दुसरीकडे येथील उत्कृष्ट नियोजन पाहून आपल्या गावात गटात मतदारसंघात अशी कोव्हिड सेंटर चालू करता येईल का यावर सुद्धा विचार करू लागले. त्यामुळे आमदार लंके यांच्या या कोरूना शेवटची भुरळ अनेक अराजकीय व सामाजिक संस्थांना पडली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here