लंगर सेवेला लहान मुलाने दिली ईदीची रक्कम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

लंगर सेवेला लहान मुलाने दिली ईदीची रक्कम

 लंगर सेवेला लहान मुलाने दिली ईदीची रक्कम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
रमजान ईद साजरी होत असताना अवघ्या सात वर्षाच्या साहिल मुन्शी या मुलाने ईद निमित्त मिळालेली ईदीची रक्कम घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्यास मदत म्हणून दिली. साहिल याने ईदीची रक्कम लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, उबेद शेख, डॉ.रिजवान अहेमद, नगरसेवक आसिफ सुलतान, समीर खान, प्रितपालसिंग धुप्पड, मनोज मदान, राजा नारंग, सतीश गंभीर, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, सिमर वधवा, अर्जुन मदान आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगर सेवेच्या वतीने कोविड सेंटर चालविले जात आहे. तसेच कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे कार्य सुरु आहे. या सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलित साहिल या लहान मुलाने आपली ईदीची रक्कम दिली. लंगर सेवेच्या सेवादारांनी लहान मुलामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक भावनेचे कौतुक करुन त्याच्या मदतीचा स्विकार केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here