शहराप्रमाणेच 'या' ठिकाणी केली कडक लॉकडाऊनची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

शहराप्रमाणेच 'या' ठिकाणी केली कडक लॉकडाऊनची मागणी

 शहराप्रमाणेच 'या' ठिकाणी केली कडक लॉकडाऊनची मागणी 



नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर - अहमदनगर शहराबरोबर नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. मुत्यूचे प्रमाणही वाढले आहे .शहरात ज्या पध्दतीने  कडक लॉकडाऊन केले तसेच लॉक डाऊन  नगर तालुका व एमआयडीसी मध्ये करावे या बाबतचे निवेदन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना दिले आले .

नगर शहराप्रमाणेच नगर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती मोठया संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये माहिती घेतल्यानंतर शासकीय नोंदी व्यतिरिक बाधित रुग्ण कित्येक पटीने जास्त आहेत. निव्वळ मोठ्या गावांचा विचार केला तरी त्याठिकाणी दोनशे ते तिनशे रुग्ण संख्याची  सरासरी आढळते. यातील अनेकांची तपासणी होत नाही. लक्षणे असून असे रुग्ण फिरताना दिसतात. सर्व गावांमध्ये काही अपवाद वगळता पुढील अडचणी प्रकर्षाने आढळतात. गाव पातळीवर समित्यामध्ये उदासिनता दिसून येत आहे. तपासणी प्रक्रिया थंडावली. नागरिक सूचनांचे पालन करत नाहीत, क्वारंटाईन होणे टाळले जाते. अपवाद वगळता अनेक तलाठी सहकार्य करत नाहीत. आरोग्य कर्मचारी कमी संख्येने असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे .

रुग्णांचे कुटुंबिय विलगीकरण न झाल्याने त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे .

एमआयडीसी  परिसरात भरणारा बाजार डोकेदुखी ठरत आहे.एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांमध्ये शहर व तालुक्यातुन येणारे हजारो कामगार एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अनेक कुटुंबेच बाधित होत आहेत. तालुक्यातील मृतांची संख्या सुद्धा अधिकृत संखोपेक्षा जास्त आहे. ही बाब अत्यंत गंभीर होऊ नये यासाठी आपण, शहराप्रमाणेच नगर तालुका व एमआयडीसी  मध्ये कडक लाकडाउन करण्यात यावे. व त्याची कडक अंमलबजावणीचे आदेश दयावेत. यासाठी सर्व सहकार्य पंचायत समितीच्या वतीने करण्यात येईल. 


कोट 

" ज्या ठिकाणी गावकरी राजकारण बाजूला ठेवून काम करत आहेत त्या ठिकाणी परिस्थिती निश्चितच चांगली दिसून येत आहे. मात्र अशा गावांची संख्या खूप कमी आहे. प्रशासन म्हणून आम्ही तर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत आणि करत राहू, मात्र समाजाकडून लवकरात लवकर मानसिक बदल होणे अत्यंत आवश्यक आहे.  जास्तीत जास्त गावांमध्ये जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तपणे जाहीर केले जावे आणि त्यची अंमलबजावणी पण करणेत यावी.  मी पण स्वतःहून शक्य ते सर्व प्रयत्न करेन... जास्तीत जास्त गावातील जनता कर्फ्यू यशस्वी व्हावा यासाठी आपण सर्वांनीच अगोदर जनता कर्फ्यू  जाहीर करून आणि नंतर त्याची चांगली अंमलबजावणी करून सहकार्य करावे.आम्ही लागेल त्या मदतीसाठी फिल्डवर आहोतच."

 - उमेश पाटील, तहसीलदार अहमदनगर

No comments:

Post a Comment