महावितरणच्या लाईट बिलाबाबत गोंधळ.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 2, 2021

महावितरणच्या लाईट बिलाबाबत गोंधळ..

 महावितरणच्या लाईट बिलाबाबत गोंधळ..नगरी दवंडी

अहमदनगर  :  सध्या करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजारपेठा,खाजगी कंपन्या, व रोजगार बंद आहेत त्यामुळे नागरिक त्रस्त आहे त्यातच महावितरणने  अवास्तव बिल पाठवल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारचे रिडींग न घेता अगदी मनास वाटेल त्या प्रकारचे  वाढीव युनिट टाकून एक प्रकारे नागरिकास वेठीस धरण्याचे काम महावितरणने चालवले आहे. सध्या  परिस्थितीमुळे आधीच नागरिक हैराण असून त्यातच महावितरणने वाढीव बिल देऊन एक प्रकारे नागरिकास शॉक देण्याचे काम केले आहे. मागील आठवड्यापासून महावितरणने  चालू महिन्याचे लाईट बिल पाठवण्याचे काम चालू केले आहे परंतु त्या लाईट बिलामध्ये अनेक त्रुटी असून  चालू रीडिंग उपलब्ध नसल्यामुळे  विज बिल कुठल्या निष्कर्षावर पाठवण्यात आले आहे याबाबत नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता आवाजावी बिल पाठवून  महावितरण कडून सामान्य नागरिकास  त्रास देण्याचे काम चालू केले आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास गेले असता त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येत असल्याची बीज धारक ग्राहकांकडून कळाली  त्यामुळे या वीज बिलाबाबत वरिष्ठांनी योग्य निर्णय घेऊन सुधारित लाईट बिल ग्राहकांना पुन्हा वितरित करण्यात यावे अशी मागणी नागरिक नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here