क्रिकेटच्या मैदानावर भेंड्यात गोळीबार.दोन संशयित ताब्यात . - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

क्रिकेटच्या मैदानावर भेंड्यात गोळीबार.दोन संशयित ताब्यात .

 क्रिकेटच्या मैदानावर भेंड्यात गोळीबार.दोन संशयित ताब्यात .



नगरी दवंडी

प्रतिनिधी: नेवासा  

काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भेंडा येथे क्रिकेट खेळत असताना पूर्वीच्या वादातून  झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१,रा.भेंडा. नेवासा)हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

काही युवक क्रिकेट खेळत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि चुकून सोमनाथ तांबे हा युवक मधे आल्याने त्याच्या छातीमध्ये गोळी लागुन तो जखमी झाला .गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले .  हल्लेखोरांना दुसरे कुणाला तरी लक्ष्य करायचे होते परंतु सोमनाथ तांबे हा युवक मध्यस्थी आल्याने  चुकून गोळी त्याच्या छातीमध्ये घुसली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे .दरम्यान जखमी तांबे याच्या जबाबावरून  दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेवासा पोलिस ठाण्यात भादवी कलम ३००नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री . विजय करे करत आहेत .

No comments:

Post a Comment