एक लाख साठ हजार रुपये किमतीचे औषध देऊन गुरुजींचा वाढदिवस साजरा..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 13, 2021

एक लाख साठ हजार रुपये किमतीचे औषध देऊन गुरुजींचा वाढदिवस साजरा.....

 एक लाख साठ हजार रुपये किमतीचे औषध देऊन गुरुजींचा वाढदिवस साजरा..... नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

खर्डा: येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रविशंकर जी(गुरूजी) यांचा वाढदिवस साजरा करून त्यानिमित्ताने कोरोना सेंटरला औषधांची मदत केली.

     खर्डा व परिसरातील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड चे डॉ.रजनीकांत आरोळे या कोविड सेंटरला वाढदिवसानिमित्त तब्बल  एक लाख साठ हजार रुपये किमतीचे औषध जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले. तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचार चालू असलेल्या जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल च्या कोरोना सेंटरला सामाजिक बांधिलकी राखत आर्ट ऑफ लिव्हिंग खर्डा परिवाराने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औषधांच्या स्वरूपात भेट देऊन सामाजिक बांधिलकी राखली. 

     यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे संतोष थोरात, रवी कुलकर्णी, शिवाजी भोसले, कल्याण सुरवसे, महेश लोंढे, गणेश जोगदंड, संजय पाटील, अशोक घाडगे, किशोर शेवाळे, भूषण शहा, सागर शहा, महेश दिंडोरे,कांतीलाल खिवंसरा,चंद्रकांत गोलेकर,वैशाली थोरात,संजीवनी पाटील, दत्तराज पवार,गणेश जव्हेरी,पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here