2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची लस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 12, 2021

2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची लस

 2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची लसनगरी दवंडी

 नवी दिल्ली -देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. देशभरात सध्या 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारतर्फे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना सर्वात जास्त घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आता भारतामध्ये लहान मुलांनाही कोरोनाची लस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2 ते 18 वर्ष वयोगटातील लहान मुलांना तिसर्‍या लाटेत मोठ्या संक्रमणाचा धोका असल्याचं बोललं जात असतानाच आता 2 ते 18 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्याच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच लवकरच या वयोगटातील मुलांना लस देण्याची मोहीम सुरू होईल.

लहान मुलांना देण्यात येणारी कोरोना लसीची चाचणी करण्याची शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने केली होती. त्यानंतर, मंगळवारी त्याला मंजुरी देण्यात आली असून 525 मुलांवर क्लिनिकल ट्रायल केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली येथील एम्स, पाटणामधील एम्स तसेच नागपूरमधील एम्स रुग्णालयात या ट्रायल करण्यात येणार आहेत.

कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार, भारत बायोटेक या कंपनीला फेज-3 ची ट्रायल पूर्ण करण्याअगोदरच फेज-2 चा संपूर्ण डेटा द्यावा लागणार आहे. भारत बायोटेकचा फेज 2 आणि फेस 3 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने केली होती. ज्यामध्ये 2 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी करण्यात येणार्‍या कोवॅक्सिनचा समावेश आहे. भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे लवकरच लहान मुलांनाही कोरोनाची लस देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या ट्रायल्स पूर्ण होऊन लहान मुलांना कधीपर्यंत लस उपलब्ध होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here