आ. लंकेंची हवा ! फुलांचा वर्षाव, सुप्रिया सुळेंची भेट आणि आमदारांचा गराडा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 13, 2021

आ. लंकेंची हवा ! फुलांचा वर्षाव, सुप्रिया सुळेंची भेट आणि आमदारांचा गराडा !

 आ. लंकेंची हवा ! फुलांचा वर्षाव, सुप्रिया सुळेंची भेट आणि आमदारांचा गराडा !नगरी दवंडी

पारनेर :  प्रतिनिधी

महिनाभराच्या अवधीनंतर आमदार नीलेश लंके मुंबईत पोहचले त्यावेळी तेथे आ. लंके यांचीच हवा असल्याचे चित्र पहावयास मिळाले ! मंत्रालयात ते पोहचताच विविध मतदारसंघातील आमदारांनी त्यांना गराडा घातला. कोव्हिड सेंटर चालविता कसे ? अशी विचारणा करीत त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करण्यात येत होते. मंत्रालयातील काम आटोपून परतत असताना मरीन ड्राईव्हवर खा. सुप्रिया सुळे यांनी आ. लंके यांना थांबवून त्यांच्या कामाचे कौतुक केले तर मुंबईतून बाहेर पडताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येउन आ. लंके यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. आ. लंके यांच्या मुंबईदौऱ्या दरम्यान १९ लाख रूपये देणगी जमा झाल्याचे अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले. 

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये आ. लंके यांनी दि. १४ एप्रिल रोजी शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर सुरू केले. १ हजार सामान्य तर १०० बेडला ऑक्सीजनची सुविधा देण्यात आली आहे. आ. लंके यांनी पहिल्या लाटेतही १ हजार बेडचे आरोग्य मंदीर सुरू करून खा. शरद पवार यांच्यासह राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या महिन्यात आ.लंके यांनी सुरू केलेल्या आरोग्य मंदीरात नगर जिल्हयाबरोबरच राज्यातील रूग्ण दाखल झाले. एक रूपया देखील न घेता रूग्णांचे औषधोपचार, पौष्टीक आहार तेथे  देण्यात येत आहे. आ. लंके यांच्या या कामाचा महिमा सातासमुद्रापार गेल्यानंतर देश विदेशातून आतापर्यंत तब्बल सव्वा कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. मदतीचा ओघ आजूनही सुरूच आहे. अनेकांनी वस्तूरूपात मदत केली. आ.लंके यांच्या या कामाची विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांनी दखल घेतल्यानंतर कोरोनाच्या या महामारीत जिकडे तिकडे आ. लंके यांचाच डंका वाजतो आहे. 

महिनाभराच्या अंतराने मुंबईत पोहचलेले आ. लंके सकाळी मंत्रालयात पोहचले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा  पवार यांनी पाठ थोपटून आ. लंके यांचे कौतुक केले. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना शाबासकी दिली. तेथे उपस्थित असलेल्या आमदारांनी त्यांना गराडा घालून कसे चालविता कोव्हिड सेंटर ? आम्हालाही मार्गदर्शन करा असे सांगत आमदारांनी आ. लंके यांचे कौतुक केले. 

आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनीही आ. लंके यांची भेट घेऊन आम्हाला तुमचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. दुरचित्रवाणीवर बातम्या पाहताना आम्ही आमच्या मुलांना 'आमचे १०९ चे आमदार आहेत हे असे अभिमानाने सांगतो. आम्हालाही कोव्हिड सेंटरला काम करण्यास आवडेल' अशा भावनाही व्यक्त केल्या. कुलाबा येथे पारनेरकारांनी आमदारांसाठी भोजणाची व्यवस्था केली होती. त्यांनी ७ लाख रूपयांचा निधीही दिला. भोईसर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, सानपाडा, कामोठे, नेरूळ येथे आ. लंके यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी कोव्हिड सेंटरला मदतही करण्यात आली. 

ठिकठिकाणी आ. लंके यांना भेटलेल्या नागरीकांमध्ये सर्वपक्षिय कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यांनी आ. लंके यांच्याकडून कामाची माहीती घेतली. पूर्वी पारनेर किंवा नगर जिल्हयातील नागरीक आ. लंके यांच्या भेटीसाठी येत. यावेळच्या भेटीत मात्र स्थानिक मुंबईकरांसह राज्यातील विविध जिल्हयांच्या नागरीकांचा समावेश होता. अनेक कोकणी नागरीकांनीही आ. लंके यांची भेट घेत मदत देण्याची तयारी दर्शविली. 


खा. सुप्रिया सुळे यांचा सुखद धक्का ! 

  मरीन ड्राईव्हवरून आ. लंके यांचे वाहन निघालेले असताना पाठीमागून आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांनी त्याचे वाहन ओळखले. सोबतच्या स्वीय सहायकास आ. लंके यांचे वाहन थांबविण्यास सांगितले. आ. लंके व त्यांचे सहकारी वाहनातून उतरल्यानंतर समोर स्वतः सुप्रिया सुळे उभ्या होत्या. 'नीलेश भाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहात. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. नीलेश भाऊ  तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या' असा सल्लाही खा. सुळे यांनी दिला. 'तुम्ही सर्वांनी जेवण केले का ?नसेल तर तुमच्या जेवणाची सोय करते' असेही खा. सुप्रिया म्हणाल्या. सर्वांनी जेवण केल्याचे सांगितल्यानंतर खा. सुळे व आ. लंके यांनी निरोप घेतला. दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे लवकरच रूग्णांशी संवाद साधू अशी ग्वाही खा. सुळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here