लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या आव्हानाला काकनेवाडी च्या ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या आव्हानाला काकनेवाडी च्या ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद....

 लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या  आव्हानाला काकनेवाडी च्या ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद....

मुंबईकर मित्र मंडळाचे अध्यक्ष जयवंत शेठ वाळुंज यांच्या कडून 55व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 55 हजाराचा किराणा भेट.     नगरी दवंडी

  पारनेर प्रतिनिधी

 कोविड च्या रुगनावर उपचार व्हावेत म्हणून मा आमदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भालवणी येथे1000बेड चे शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरु झाल्यानंतर या कोविड सेंटर ला मदतीसाठी आव्हान करण्यात आले होते. यासाठी काकनेवाडी येथील युवा कार्यकर्ते ,योगेश वाळुंज, विष्णू वाळुंज, बबन वाळुंज, रावसाहेब वाळुंज ओंकार पुरी या तरुणांनी पुढाकार घेतला

जयवंत बा. वाळुंज यांच्याकडून वाहतूक सौजण्य लाभले. प्रत्येक कुटुंबातून आर्थिक किंवा धान्य स्वरूपात मदत करण्याची विनंती घरोघरी जाऊन ग्रामस्थना केली काकनेवाडी तील तरुणांच्या या योजनेला उदंड प्रतिसाद देत एक हजार किलो गहू, तांदूळ कांदा लसूण आणि आर्थिक मदत केली.

    काकनेवाडी गावावर वारकरी संप्रदाय चा विशेष प्रभाव असूनअडचणीत असणाऱ्या कुटुंबाना, धार्मिक कार्याला सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सहकार्य करतात

   अयोध्या येथील राममंदिरासाठी ग्रामस्थानी 24हजार रुपयचे योगदान दिल्याची माहिती हभप रंगनाथ महाराज वाळुंज यांनी दिली.तसेच योगदान देणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचे आभार युवा नेते संभाजी वाळुंज यांनी मानले.

No comments:

Post a Comment