जास्तीतजास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

जास्तीतजास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 जास्तीतजास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे




नगरी दवंडी

 नगर –   सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दाना बाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या बंधू भगिनींचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अॅड. अभिषेक भगत यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मा दान मोहीमेच्या जनजागृतीसाठी पुढाकर घेतला आहे. त्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची त्यांनी भेट घेवून प्लाझ्मा दान मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. मंत्री तनपुरे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी अॅड. अभिषेक भगत यांच्या समवेत नगर शहरातील जनकल्याण रक्तपेढीला भेट देवून प्लाझा संकलनाची सविस्तर माहिती घेतली. जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये यांनी त्यांना माहिती दिली. यावेळी व सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, डॉ. गुलशन गुप्ता, सुशांत पारनेरकर उपस्थित होते.

मंत्री प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात कोरोनाचा अजून प्रादुर्भाव वाढण्यची शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होत आहे. जिल्हा आरोग्यधिकारी व महानगरपालिका कडूनही करोनावर मात केलेल्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांना वैय्यक्तिक संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करणार आहे. अॅड. अभिषेक भगत यांनी प्लाझ्मा दान मोहीम सुरु करून अत्यावश्यक उपक्रम हाती घेतला आहे.

प्रास्ताविकात अॅड. अभिषेक भगत म्हणाले, कोरोना रोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात या विषाणूच्या विरोधात तयार झालेल्या अॅन्टीबॉडीज मुळे अत्यवस्थ रुग्ण कमी कालावधीत बरे होण्यास मदत होत आहे. रक्तदान करण्यासारखेच प्लाझ्मा दान असल्याने कोरोना रोगातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जावे. याबाबत सामाजिक माध्यमांद्वारे जास्तीतजास्त जनजागृती करत आहे.

No comments:

Post a Comment