जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते आयोजित माझं जामखेड माझी जबाबदारी महाराष्ट्र दिन निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते आयोजित माझं जामखेड माझी जबाबदारी महाराष्ट्र दिन निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

 जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते आयोजित माझं जामखेड माझी जबाबदारी महाराष्ट्र दिन निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...



नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी

गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, जामखेड पोलीसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.

राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दिनांक 01 मे रोजी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतीसाद मिळत आहे. याचे उद्घाटन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

राज्यात 18 वर्षावरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या काळात पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता लसीकरणाआधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या अवहानाला संपूर्ण तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असुन सकाळ पासून तालुक्यातील युवकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळुन रक्तदान करण्यास सुरुवात केली. दुपारी तीन वाजेपर्यंत 350 युवकांनी रक्तदान केले. या शिबिरात पोलीसांन बरोबरच तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनां व नागरिक खास परीश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment