आता दुचाकीवर डबल सीट दिसल्यास कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 1, 2021

आता दुचाकीवर डबल सीट दिसल्यास कारवाई

आता दुचाकीवर डबल सीट दिसल्यास कारवाई


नगरी दवंडी

नगर: जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांकामी अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.तथापि, सूट असलेल्या सेवा/बाबीकरीता मोठया प्रमाणावर दुचाकीवर दोन व्यक्ती (डबलशिट) फिरत असल्याची बाब  निदर्शनास आल्याने प्रशासनाने १ मे रोजी नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता जिल्हयामध्ये दि.02/05/2021 ते 15/05/2021 या कालावधीत दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तीस (वैदयकीय कारण वगळून) प्रवासास मनाई करीत आहे.

उपरोक्त आदेशाची पोलीस विभाग, परिवहन विभाग व स्थानिक प्राधिकरणाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here