लोकवर्गणीतून निवडून आलेला आमदार इतके महान कार्य करतो हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद ! - आ.डॉ.किरण लहामटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 1, 2021

लोकवर्गणीतून निवडून आलेला आमदार इतके महान कार्य करतो हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद ! - आ.डॉ.किरण लहामटे

 लोकवर्गणीतून निवडून आलेला आमदार इतके महान कार्य करतो हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद !

आ.डॉ.किरण लहामटे

आ.लंके यांच्या सामाजिक कार्याचे महाराष्ट्रासह देशातील अनेक नेतेमंडळींनी दूरध्वनीद्वारे केले कौतुक !

आ.लंके ठरले महाराष्ट्रातील लाखो तरुणाईचा ऊर्जा स्त्रोत नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

       माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नावाने भाळवणी येथे 1000 सर्वसाधारण रुग्णांसाठी तर 100 प्राणवायूचे बेड उपलब्ध करत पूर्ण दिवस आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रुग्णसेवा करणारे आमदार निलेश लंके हे आज महाराष्ट्रातील तरुणाईचा व सर्वसाधारण सामान्य जनतेचा कौतुकाचा विषय ठरला आहे .सर्व प्रसारमाध्यमांवर सध्या एकच चर्चा गाजती आहे ती म्हणजे लोकनेते आमदार निलेश लंके यांची व त्यांनी चालू केलेल्या कोवीड सेंटरची .

       महाराष्ट्रातील आमदारांपैकी अनेक आमदार साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट असून पिढीजात गर्भश्रीमंतीत राजकारण करत आहेत.आज सर्वसामान्य जनता कोरोणाच्या विळख्यात सापडली असताना ज्यांनी आपनास निवडून दिले त्या जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या आलिशान महालात स्वतःची व त्यांच्या कुटुंबाची चिंता करत बसले आहेत, परंतु लोकवर्गणीतून निवडून आलेला आमदार जो आजही पत्र्याच्या साध्या घरात राहतोय प्रथमच आमदार झालेल्या एका गरिबाच्या मुलांनी माझा परखा भेदभाव न करता मतदार संघातील व जिल्ह्याबाहेरील ही अनेक रुग्णांना या कोवीड सेंटरमध्ये जीवदान दिले आहे .

        देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह देशभरातून अनेक मान्यवर नेतेमंडळी सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था आमदार निलेश लंके यांच्या परोपकारी कार्याचे कौतुक करत आहेत. व त्यांना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सल्ला देत आहे . अनेक मान्यवर नेतेमंडळी हे कौतुकास्पद जीवदान देणारे आमदार लंके यांचे कार्य पाहण्यासाठी भाळवणी येथे येत आहेत .शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख तसेच अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी या कोवीड सेंटरला भेट देत समाधान व्यक्त केले .

       यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे व कोवीड सेंटरचे कौतुक करत महाराष्ट्राच्या इतिहासात इतके महान कार्य करणारे आमदार निलेश लंके साहेब त्यांची प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रात तरुणाई कोरोना रुग्णांची सेवा करताना दिसून येत आहे . प्रत्येक प्रसार माध्यमांवर फक्त निलेश लंके व त्यांचे कार्याची चर्चा पहावयास व ऐकावयास मिळत आहे.जीवाशी खेळणाऱ्या या आमदारांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण महाराष्ट्राला तुमची गरज आहे असे यावेळेस श्री.शेख यांनी म्हटले आहे .राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे कोविड सेंटर पाहून प्रभावित झाले . डॉक्टर असल्या कारणाने या आरोग्य मंदिरातील प्रत्येक रुग्णाची तपासणी व विचारपूस केली .

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरलेले व लोकवर्गणीतून निवडून आलेला एक आमदार इतके मोठे कोवीड सेंटर उभा करतात व त्यांना महाराष्ट्रभरातून लोकवर्गणी भेटते, अकराशे बेडचे सेंटर चालू होते हे पाहिल्या नंतर असे वाटते की हा एक चमत्कार आहे . आमदार लंके करत असणारी रुग्णसेवा पाहून ॲडमिट झालेले रुग्ण सुद्धा हसतमुख आहेत त्यांच्या चेहर्‍यावर समाधान आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे ,आपण काय सेवा देऊ शकतो याची स्पर्धा कार्यकर्त्यांमध्ये लागलेली दिसुन येते . इतके समाधानी वातावरण कि बाहेर जाताना रुग्ण अश्रूंना वाट मोकळी करून देतात या प्रमाणे जिव्हाळ्याचे परिवारातील सदस्य म्हणून परिवारिक वातावरण येथे निर्माण केले गेले आहे .मतदार संघ हे आपले कुटुंब आहे व त्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे असे सांगणारे आमदार लंके त्यांचा आदर्श घेऊन मी माझ्या तालुक्यातही शिक्षकांच्या मदतीने आमदार लंके यांची प्रेरणा घेऊन 50 ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू करत आहे . माझ्या तालुक्यातही पक्षाचे कार्यकर्ते व विरोधक मिळून बऱ्याच ठिकाणी मीळून एकूण 800 बेडचे सेंटर चालू आहे .परंतु एकाच जाग्यावर एवढे मोठे सेंटर चालवणे व तेही मोफत ! हे फक्त महाराष्ट्रात आमदार निलेश लंकेच करू शकतात याचा मला अभिमान आहे व आमच्यासाठी ती मार्गदर्शक बाब आहे .आमदार लंके यांचे कार्य गौरवास्पद व अभिमानाला पात्र आहे .

        कोरोना संपल्यानंतर माझ्या या मार्गदर्शक भावाने मतदार संघात एक मोठे हॉस्पिटल उभारावे व त्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची रुग्णसेवा त्यांच्या हातुन घडावी आशा  शुभेच्छा देतो . व हेच पुण्य आमदार लंके यांना भविष्यात नक्की कामी येणार अशी मी ग्वाही देतो !आमआमदारक्टर किरण लहामटे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here