संदीप पाटील वराळ कोव्हिड सेंटर सुसज्ज हॉस्पिटलसारखे : प्रांताधिकारी सुधाकर भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

संदीप पाटील वराळ कोव्हिड सेंटर सुसज्ज हॉस्पिटलसारखे : प्रांताधिकारी सुधाकर भोसले

 संदीप पाटील वराळ कोव्हिड सेंटर सुसज्ज हॉस्पिटलसारखे : प्रांताधिकारी सुधाकर भोसले

 निघोज येथील  संदीप वराळ पाटील कोव्हिड सेंटरची प्रांत अधिकाऱ्यांनी केली पाहणी



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

निघोज येथील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटर हे सुसज्ज हॉस्पिटलसारखे असून यामध्ये कोरोना रुण्गांना चांगली सेवा मिळत असल्याचे गौरवोद्गार प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी व्यक्त केले.भोसले यांनी सोमवार दि.१० रोजी दूपारी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला भेट देऊन पाहणी केली तसेच आवश्यक त्या सुचना करीत समाधान व्यक्त केले.यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ अजित लंके, मंडल अधिकारी पंकज जगदाळे, कामगार तलाठी आकाश जोशी, संदीप पाटील युवामंचचे पदाधिकारी सुनिल पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भास्करराव कवाद, निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी डोणे, डॉ संदेश थोरात, जे बी खेडकर, आरोग्य सेवीका अर्चना कोठावळे, सुमन शेटे आदी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य संदीप पाटील वराळ युवामंचचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रांताधिकारी भोसले यावेळी म्हणाले हे कोव्हिड सेंटर निसर्गरम्य ठिकाणी व सुसज्ज इमारतीमध्ये असल्याने आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आल्याचा भास आपल्याला होत आहे. 

     संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी चांगले नियोजन केले असून स्थानिक डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांचे सातत्याने रुण्गांकडे लक्ष असल्याने शंभर बेडच्या या कोव्हिड सेंटरमध्ये रुण्ग लवकर बरे होत असून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले नियोजन केले असून अशाप्रकारे कोव्हिड सेंटर सुरू करुण ईतरांनी सेवाभाव करावा असे आवाहन त्यांनी केले.संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी या कोव्हिड सेंटरची माहिती देताना सांगितले की शंभर बेडच्या या कोव्हिड सेंटरमध्ये गेली आठ दिवसांत साठ पेक्षा जास्त रुण्ग ॲडमीट झाले होते.

   यामध्ये आठ ते दहा रुण्ग बरे होउन घरी गेले आहेत.या कोव्हिड सेंटरसाठी ग्रामस्थांनी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिला असून परिसरातील डॉक्टर व आरोग्य विभागासंदर्भातील डॉक्टर अधिकारी कर्मचारी आरोग्य सेवीका यांनी चांगले सहकार्य केले असून ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी प्राथमिक उपचार घेण्यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होण्याचे आवाहन वराळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment