"नगर तालुक्याला जादा लसीचा पुरवठा करा" सभापती गुंड यांचे महसूल मंत्र्यांना साकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

"नगर तालुक्याला जादा लसीचा पुरवठा करा" सभापती गुंड यांचे महसूल मंत्र्यांना साकडे

 "नगर तालुक्याला जादा लसीचा पुरवठा  करा"

सभापती गुंड यांचे महसूल मंत्र्यांना साकडे 


नगरी दवंडी

अहमदनगर : नगर तालुक्यात कमी प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याने बहुतांशी गावातील जेष्ठ नागरिक लसीपासुन वंचित आहेत . यामुळे नगर तालुक्यासाठी जादा लसींचा पुरवठा करावा अशी मागणी नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

याबाबत सभापती गुंड  म्हणाल्या की नगर तालुक्यात आतापर्यत केवळ १ हजार ७४९ लसींचा पुरवठा झाला असुन तालुक्यात यातुन १८ हजार ११७ जणांनाच लस देण्यात आली आहे . तालुक्याची संख्या पाहता तालुक्यात आजपर्यत झालेले लसीकरण कमी आहे . तालुक्यात ४५ वर्षापुढील नागरिकांची संख्या ८o हजार असुन अद्याप बहुतांशी जेष्ठ नागरिक लसीपासुन वंचित आहेत . लसींचा अल्प पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहिम पुर्ण क्षमतेने होत नाही . शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही लसीकरण मोहिमेचे उध्दिष्ट पुर्ण होण्यासाठी जादा प्रमाणात लस मिळावी असे साकडे सभापती गुंड यांनी महसुल मंत्री थोरात यांच्याकडे केले आहे .

No comments:

Post a Comment