कोरोना संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मनपा आरोग्य समितीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

कोरोना संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मनपा आरोग्य समितीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

 कोरोना संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मनपा आरोग्य समितीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

नाशिक विभागीय उपाआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी घेतला कोरोनाचा आढावा


नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी-कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर शहराला लसीकरणा कोटा वाढून मिळावा तसेच जास्तीत-जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करून कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.तसेच लसीकरण केंद्रावर होणारे गर्दीचे नियोजन करून गर्दी कशी नियंत्रणात आणता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात लसीकरण्याच्या एक दिवस अगोदरच सायंकाळी लसीकरणाचे नाव व उपलब्ध असलेल्या ढोसची संख्या दर्शनी भागाच्या बोर्डवर लावावी तसेच लसीकरणासाठी होत असलेली वशिलेबाजी थांबून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करावे,तसेच कोणी दादागिरी करून लसीकरण केंद्रावर लस देण्यासाठी बळजबरी करत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले,५मिनिटात याठिकाणी पोलीस यंत्रणा येईल लसीकरणामुळे महापालिकेची बदनामी खूप झाली नियोजनाने काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल एकाच दिवशी सर्व केंद्रावर एकच कंपनीची लस उपलब्ध होईल, जा लसीकरण केंद्रावर कोणाचा दबाव किंवा दडपशाही आहेत त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या आरोग्य केंद्र प्रमुखाची असेल,याठिकाणी आरोग्य केंद्र प्रमुखाने पोलीस स्टेशन प्रमाणे डायरी ठेऊन यामध्ये दिवसभरातील होणाऱ्या अडीअडचणी, कोणाचा दबाव तसेच कर्मचाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा होत असेल या सर्व बाबींची नोंद या डायरीमध्ये करून वरिष्ठांकडे तक्रार करावी, कोरोनाच्या संकट काळामध्ये सर्वांनी एकत्रितपणे येऊन कोरोची लढाई जिंकायची आहे शहरांमध्ये दररोज ५ हजार कोरोना तपासणी करावी, शहरातील २५ हजार नागरिकांचा कोरोना लसीकरणाचा पहिला ढोस देऊन झाला आहे तरी दुसऱ्या ढोसचे नियोजन करून प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार दूरध्वनीद्वारे किंवा मेजेस द्वारे संपर्क साधून केंद्रावर बोलून घ्यावे जेणेकरून गर्दी टाळण्यास मदत होईल आता पर्यत शहरातील सुमारे ५ हजार नागरिकांना दोन्ही लसीकरणाचे डोस देण्यात आले आहे.यावेळी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश नाशिकचे उपविभागीय आयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सचिन जाधव, सतीश शिंदे,बाळासाहेब पवार,आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे व आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.

         नाशिक विभागीय उपाआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी महापौर,आयुक्त तसेच मनपाच्या आरोग्य समितीच्या सदस्यांसमवेत शहरातील विविध कोविड सेंटरला भेटी देऊन माहिती जाणून घेतली यावेळी मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.

No comments:

Post a Comment