प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटीजेन तपासणी शिबिराचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटीजेन तपासणी शिबिराचा शुभारंभ

 प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटीजेन तपासणी शिबिराचा शुभारंभ

प्रभाग क्रमांक १ हा कोरोना मुक्त करू-विरोधी पक्षनेता संपत बारस्कर



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी-कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.कोरोनाचे लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तपासणी करून उपचार घेणे गरजेचे आहे.कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची भीती निर्माण होते, यासाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांची मोफत अँटीजेन तपासणी सुरू केली आहे,जेणेकरून प्रभाग क्रमांक १ हा कोरोना मुक्त होण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या शंकेचे निरसन करून घेणे गरजेचे आहे.नागरिकांनी भयभीत न होता उपचारासाठी पुढे आले पाहिजे तरच आपण ही कोरोनाची लढाई जिंकू शकतो असे प्रतिपादन,मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.

    अहमदनगर मनपा व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक १ मध्ये मोफत अँटीजेन तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे,डॉ. माधुरी गाढे,पल्लवी सगळगीळे,विकास खरात,पंकज भांबळ,वैभव थोरात,बाबा डिसोजा,विपुल घोडके,आकाश महागन,दिलावर पठाण, ज्ञानेश्वर कासवत, शंभू जपकर,किरण आडोळे आदी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोराडे म्हणाले की,कोरोनाच्या अँटीजेन तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मदत होईल,जेणेकरून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत राहील. यासाठी प्रभागांमध्ये दोन दिवस अँटीजेन चाचणी शिबिर ठिकाणी घेण्यात येणार असून यामध्ये जे कोणी कोरोना पॉझिटिव्ह येईन त्यांना विलगीकरण कक्षामध्ये पाठवून त्याच्यवर उपचार करण्यात येईल,तरी या तपासणीचा प्रभागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment