वाघुंडे गावात मास्क वितरणातुन कोरोना सुरक्षितता जनजागृतीचा शुभारंभ..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

वाघुंडे गावात मास्क वितरणातुन कोरोना सुरक्षितता जनजागृतीचा शुभारंभ..!

 वाघुंडे गावात मास्क वितरणातुन कोरोना सुरक्षितता जनजागृतीचा शुभारंभ..!




नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची वाढती संक्रमन क्षमता तीव्रता पाहता त्याचा गंभीर परिणाम हा लहान मुलांवर होवु शकतो त्यामुळे याचे गांभिर्य लक्षात आधार फांउडेशन व विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन गावोगावी मास्क वितरणासोबत कोरोना सुरक्षिततेची जनजागृती करण्याचा महासंकल्प करण्यात आला असुन याची सुरुवात वाघुंडे गावात नागरिकांना मास्क वितरणाबरोबर कोरोनाच्या पहील्या,दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट अत्यंत तीव्र असुन आपल्या आरोग्य व्यवस्था दुसर्‍या लाटेत हतबल झालेली आपण पाहीलेली आहे त्यामुळे आपण आपल्याबरोबर दुसर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावावा व आपल्या परिवारासोबत समाजाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या सकाळी लवकर उठुन योग प्राणायाम करुन स्वत:ला निर्भय सुरक्षित बनवावे वेळोवेळी हात स्वच्छ धुवावा मास्कचे काटेकोररपणे पालन करावे असे मनोगत आधार फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी मास्क वितरण व कोरोना जनजागृती उपक्रमाच्या निमित्ताने वाघुंडे गावातील नागरिकांना बोलताना मनोगत व्यक्त केले यावेळी अनिल दिवटे यांनी आधार फांउडेशनच्या कार्याला शुभेच्छा देत नागरिकांना कोरोनासंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी     रवि रासकर,राजेंद्र गाडीलकर,विकास रासकर,प्रतिक रासकर,विजय रासकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

पारनेर तालुका दुरदृष्टी ठेवणारा आदर्श तालुका असुन तालुक्याचा आदर्श महाराष्ट्रासाठी नेहमीची प्रेरणादायी ठरला असुन याला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी सर्वांची असुन प्रत्येकाने तालुक्याला आपल्या विशिष्ट उंचीवर ठेवण्यासाठी कृतीशिल राहण गरजेचे आहे पुढच्या पिढिच्या उज्वल भविष्यासाठी व आपल्या मास्क वितरणाबरोबर कोरोना सुरक्षिततेच्या जनजागृतीच्या कार्याला सहकार्य करणार्‍या सर्वांचे मनापासुन धन्यवाद- शरद पवळे

No comments:

Post a Comment