समाज सुधारणेचे स्वातंत्र्यवीरांचे कार्य लक्षणीय- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

समाज सुधारणेचे स्वातंत्र्यवीरांचे कार्य लक्षणीय- भैय्या गंधे

 समाज सुधारणेचे स्वातंत्र्यवीरांचे कार्य लक्षणीय- भैय्या गंधे

भाजपा व चंद्रशेखर आझाद प्रतिष्ठान यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवांदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी इतकेच समाजसुधारणेच्या क्षेत्रातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य लक्षणीय आहे. सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट होते. त्यांनी खर्या आदर्श राष्ट्रवादाचे समर्थन केले. जगा व इतरांना जगू द्या ही त्यांची तत्ववे होती. क्रांतीकारक, राजकारणी, वकिल, लेखक अशा अनेक पैलूंचा आविष्कार आपल्या जीवनात घडवून आणणारे वीर सावरकर हे एक आदर्श व्यक्तीमत्व होत. त्यांचे विचार आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करुन स्वातंत्र्यवीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपा व चंद्रशेखर आझाद प्रतिष्ठान यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, श्रीराम येंडे, माजी नगरसेवक सचिन पारखी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचूघोळ, नाना देवतरसे, अमित पाखले, अविनाश परळकर, विलास भोपळे, सचिन पर्वते, रोहन सांगळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना मयुर बोचूघोळ म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  महाविद्यालयीन जीवनात देशात आणि विदेशात आपल्या क्रांतिकारी विचारांनी सर्व तरुण वर्गाला प्रभावित केले होते.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तीमत्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतीकारक, झुंजार स्वातंत्र्य सेनानी होते. आजच्या युवकांनी त्यांचे हे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. प्रतिष्ठानच्यावतीने समाजोपयोगी उपक्रम राबवून स्वातंत्र्यवीरांचे विचार कृतीतून आचरणात आणत असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, श्रीराम येंडे आदिंनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्यवीर सारकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. शेवटी अमित पाखले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment