आनंदसिंधु वृद्धाश्रमाच्या वतीने गरजुंना किराणा वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 23, 2021

आनंदसिंधु वृद्धाश्रमाच्या वतीने गरजुंना किराणा वाटप.

 आनंदसिंधु वृद्धाश्रमाच्या वतीने गरजुंना किराणा वाटप.

ऍड.कृष्णा झावरे साहेब यांनी दिला किराणा.नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सध्याच्या परिस्थितीत अनेकांवर कठीण वेळ आली आहे.अनेकांचे रोजगार गेले आहेत.हातावर हात ठेवून पोट भरणार कसं!फिनिक्सच्या अनिवासी तीर्थरुप सेवेतील वृद्ध आणि पालात रहाणारे परिवार यांना किराणा वाटप करणे अगत्याचे झाले होते.मग अशा परिवारांचा सर्व्हे करण्यात आला.या सर्व्हेसाठी राजे शिवाजी पतसंस्थेचे शाखाधिकारी किसन सोनावळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.यासाठी ऍड.कृष्णा झावरे यांनी किराणा उपलब्ध करून दिल्याने आजपासून ही वाटप सेवा सुरू झाली आहे.कोरोना परिस्थिती निवळेपर्यंत हे किराणा वाटप सुरू रहाणार आहे.आज टाकळी ढोकेश्वर, कान्हुर पठार, गांजी भोयरे,पारनेर येथील गरजुंना किराण्याचे वाटप करण्यात आले.

आजच्या किराणा वाटप योगदानात ऍड.कृष्णा झावरे साहेब,कान्हुर पठार पतसंस्थेचे मा.चेअरमन सखाराम ठुबे,राजे शिवाजी पतसंस्थेचे शाखाधिकारी किसन सोनावळे,फिनिक्स एनजीओचे व्हॉलेंटीअर प्रसाद खिलारी,वैभव लोंढे फिनिक्सचे अध्यक्ष ह.भ.प.विलास महाराज लोंढे सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here