पैलवान युवराज पठारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; तालुक्यातील कोरोना सेंटरला मदत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 23, 2021

पैलवान युवराज पठारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; तालुक्यातील कोरोना सेंटरला मदत..!

 पैलवान युवराज पठारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; तालुक्यातील कोरोना सेंटरला मदत..!

पारनेर मधील प्रत्येक कोरोना सेंटरला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिली मदत.!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वतः तालुक्यातील कोविड सेंटर ला भेट देत आर्थिक स्वरूपाची मदत केली. तालुक्यातील डॉ. श्रीकांत पठारे यांचे पूर्णवाद कोविड सेंटर, मा.आझादभाऊ ठुबे यांचे कॉ.कै.बाबासाहेब ठुबे कोविड सेंटर, मा.सुजित झावरे पाटील यांचे कै.वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटर, मा.राहुल पाटील शिंदे यांच्या कै.अण्णासाहेब शिंदे कोविड सेंटर, मा.सचिन पाटील वराळ यांच्या कै. संदीप पाटील वराळ कोविड सेंटर, मा.आ.निलेश लंके यांच्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर या सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी रु.५५५५ आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.

        आपण ज्या समाजात राहतो ,वावरतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेल्यावर्षी कोरोनाच्या काळातही त्यांनी स्वखर्चाने पारनेर शहरात औषध फवारणी केली होती व मोफत किराण्याचे वाटप केले होते तसेच सॅनिटायर, मास्क चे वाटप पारनेर शहरात मोठ्या प्रमाणावर केले होते. तसेच २९सप्टेंबर ला वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करून विक्रमी ४८० रक्त पिशव्याचे संकलन केले होते.

     यावेळी पै.गोकुळ शिंदे, संदीप सोबले, बाळासाहेब औटी, संपतराव औटी, पै.यशवंत पठारे, प्रविण पठारे व मित्र परिवार उपस्थित होता.यापुढील काळातही आपण सर्वांनी अनावश्यक कार्यक्रमांना फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here