नेत्यांच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करोनावर मात करतात मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांचे भावनीक प्रतिपादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

नेत्यांच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करोनावर मात करतात मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांचे भावनीक प्रतिपादन

 नेत्यांच्या आधारामुळे,प्रेमामुळे रुग्ण करोनावर मात करतात

मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांचे भावनीक प्रतिपादन



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

आमच्याकडे,पुणे जिल्ह्यात पंचतारांकीत सुविधा, अत्याधुनिक उपचार आहेत तरीही आम्ही माणस जगवण्यात कमी पडलो.नेते,आमदार नीलेश लंके यांनी दिलेल्या आधारामुळे,प्रेमामुळे भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात गंभीर परिस्थितीतील करोनाबाधित बरे होऊन सुखरूप घरी परततात.असे भावनीक प्रतिपादन मावळचे (पुणे) आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी केले.

          आमदार शेळके यांनी भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरास (करोना उपचार केंद्र) भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, वकील राहुल झावरे,जितेश सरडे,अभयसिंह नांगरे,संदीप रोहोकले,प्रमोद गोडसे, बाळू खिलारी, दत्ता कोरडे, संदीप चौधरी,सत्यम निमसे, राजू भाऊ चौधरी, बापू शिर्के, शाम पवार,मुकिंदा शिंदे,राजश्री कोठावळे, डॉ.मानसी मानोरकर,चंद्रकांत नवले आदी यावेळी उपस्थित होते.

         आमदार शेळके म्हणाले की, आमदार लंकेे अहोरात्र कष्ट घेत आहेत.आपली सुख दुःख विसरून करोनाबाधितांची सेवा करीत आहेत.रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना धीर देत आहेत.त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना नियतीने दिले आहे.गोरगरीबांचे आशिर्वाद आमदार लंकेना मिळत आहेत.त्याचबळावर संपूर्ण महाराष्ट्रात जे काम होऊ शकले नाही ते भाळवणीत झाले असल्याचे आमदार शेळके म्हणाले.

            आमच्याकडे सीटी स्कॅनचा स्कोअर अवघा सहा,सात असला तरी आम्ही गडबडून जातो.रुग्णासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर,रेमडेसिवीर,आणखी कोणती महागडी औषधे उपलब्ध करून देतो.मात्र माणस काही आमच्या हाती लागत नाहीत.आमच्याकडची पंचतारांकीत सुविधा, अत्याधुनिक उपचार उपलब्ध असणाऱ्या कोविड उपचार केंद्रात, रुग्णालयात माणस मारली जातात काय अशी शंका आता आम्हाला यायला लागली आहे.दुसरीकडे तुलनेने अत्यंत कमी सुविधा असलेल्या भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात सीटी स्कॅनचा २२ स्कोअर असणारे रुग्ण केवळ नेत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे,त्यांनी दिलेल्या धीरामुळे करोनामुक्त होतात.हे नेत्यांच्या कष्टाला नियतीने दिलेले फळ आहे असे आमदार शेळके म्हणाले.

           आमदार नीलेश लंके यांना नेते का म्हणतात हे याठिकाणी आल्यावर लगेचच ल‌क्षात आले.आपले संपूर्ण जीवन लोकांसाठी,जनसेवेसाठी अर्पण करणाऱ्या नीलेश लंके हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत हे त्यांचे काम पाहून पटते.आमदार लंकेे प्रामाणिकपणे करीत असलेल्या जनसेवेमुळे त्यांना कोणाकडेही मदत मागावी लागत नाही.तर लोक स्वत:हून मदतीसाठी अहमिकेने पुढे येत आहेत.देशातून, परदेशातून, राज्याच्या विविध भागातून मदतीचा अखंड ओघ सुरू आहे.ही आमदार लंके प्रामाणिकपणे करीत असलेल्या जनसेवेला मिळालेली पावती आहे असे आमदार शेळके म्हणाले.

अजितदादांना सांगणार, जनतेच्या आशिर्वादामुळे आमदार लंकेना काही होणार नाही.

मी निघताना पारनेरला निघालो असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले.त्यावेळी त्यांनी अरे, नीलेशला काळजी घ्यायला सांग,लोकांच्या सेवेसाठी नीलेशने धडधाकट रहायला हव असा निरोप द्यायला सांगितले होते.मात्र मी येथे आलो तर माझाच मास्क काढून घेतला.मी याठिकाणच वातावरण पाहिल आता अजितदादांना सांगणार आहे आमदार लंकेंची काळजी करू नका ‌दीन दुबळ्यांचे, तळागाळातील सर्वसामान्यांचे आशिर्वाद त्यांच्या बरोबर आहेत.त्यांना काही होणार नाही.

सुनीलअण्णा शेळके, आमदार,मावळ(पुणे)

No comments:

Post a Comment