नगर तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

नगर तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे

 नगर तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे

नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : नगर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख अखेर कमी होत चालला असून तालुक्यात पॉझिटीव्ह येणारी संख्या दोन अंकावर आली आहे. यामध्ये मैदानात उतरलेल्या पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड आणि उपसभापती डॉ दिलीप पवार यांचा उल्लेखनीय वाटा आहे.

कोरोना चाचण्या वाढवणे, गावपातळीवर लसीकरण करणे, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत मिळवून देणे, गरजूंना गरजेच्या वस्तूंचे वाटप करणे. या आणि अशा अनेक गोष्टी यांनी केल्या.

नगर तालुक्यात दि. २७ मे रोजी ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या ५६७ आहे तर अवघ्या एक महिन्या पूर्वी तीच संख्या १७०४ होती. दि. २७ एप्रिल ते २७ मे पर्यंत तालुक्यात आरटीपीसीआर टेस्टची संख्या २२१७८ आणि रॅपिड अँटीजेन संख्या २८५४७ अशा एकूण ५०७२५ टेस्ट करण्यात आल्या. तसेच तालुक्यात २७ मे अखेर पर्यंत ३००१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

तालुक्यातील शहापूर, पारगांव,रतडगांव,रांजणी,कौडगांव, ससेवाडी, आव्हाडवाडी,उदरमल, बुरुडगांव, देऊळगाव सिद्धी,खडकी, हिवरे झरे,बाबूर्डी बेंद,पिंपरी घुमट, वाटेफळ, हमीदपूर,हिवरे बाजार या गावांमध्ये आज एकही ऍक्टिव केस नाही.

  " जो पर्यंत संपूर्ण तालुका कोरोना मुक्त होत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही,प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार.

आपत्ती काळात जनतेला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. कोरोनाच्या  आपत्ती काळामध्ये  उपसभापती डॉ दिलीप पवार, सर्व जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी सचिन धाडगे  तालुका आरोग्य अधिकारी मांडगे  मॅडम यांचे सहकार्य मिळाल्याने काम करण्यास वाव मिळाला.जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा.मनात ठेवून यापुढेही काम करत राहणार. "

- सुरेखा संदिप गुंड, (सभापती, पंचायत समिती)

No comments:

Post a Comment