नळाद्वारे नागरिकांना पाणी येत नसल्याने सावेडीच्या गायकवाड कॉलनीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची पहाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

नळाद्वारे नागरिकांना पाणी येत नसल्याने सावेडीच्या गायकवाड कॉलनीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची पहाणी

 नळाद्वारे नागरिकांना पाणी येत नसल्याने सावेडीच्या गायकवाड कॉलनीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची पहाणी

सात दिवसात नवीन पाईपलाइन टाकण्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्याचे आश्‍वासन




नगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी येथील गायकवाड कॉलनीत नळाद्वारे नागरिकांना पाणी येत नसल्याने पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, अशपाक शेख व पवार यांनी परिसराची पहाणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, हेमंत कोहळे, जयंत रसाळ, लक्ष्मण कवडे, अतुल मांजरे, सुधीर मुळे, रविंद्र रसाळ, रविंद्र जेवरे  आदी नागरिक उपस्थित होते.

गायकवाड कॉलनीतील पाणी प्रश्‍नी नुकतीच नागरिकांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सदर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नुकतीच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पहाणी केली. नागरिकांनी जुनी पाईपलाइन जीर्ण झाली असल्याने व खाल पर्यंत नसल्याने पुरेश्या दाबाने पाणी येत नसल्याचे स्पष्ट केले. सातपुते यांनी सात दिवसात नवीन पाईपलाइन टाकण्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्याचे नागरिकांना आश्‍वासन दिले. नागरिकांनी निवेदनाची दखल घेऊन पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार मानले.

सावेडी येथील उच्चभ्रू असलेल्या गायकवाड कॉलनीत अनेक दिवसापासून नळाला कमी दाबाने पाणी येते आहे. नागरिकांना संचारबंदीतही पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. नळाद्वारे केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येत असल्याने एवढ्या थोड्या पाण्यात नागरिकांचे भागत नाही. नवीन पाईपलाइन टाकल्यास येथील नागरिकांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. -आनंद लहामगे (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना)

 

No comments:

Post a Comment