केशव – माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

केशव – माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

 केशव – माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

हिंद सेवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली : प्रांत संघचालक नानासाहेव जाधवनगरी दवंडी

नगर – जगातील ३५ देशांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे काम चालू आहे. गेल्या वर्षापासून करोना काळात पूर्ण देशात संघ सेवा कार्य करत आहे. समाजाला कशा स्वरुपाची मदत पाहिजे आहे हे ओळखून संघ सेवा कार्य करत आहे. नगरमध्येही पुण्याच्या धर्तीवर कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. रामकरण सारडा विद्यार्थी गृहाची वास्तू कोविड सेंटर साठी देवून हिंद सेवा मंडळ या शैक्षणीक संस्थेने सर्वात मोठी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. महापालिकेचीही मोठी मदत यासाठी झाली आहे. या कोविड केअर सेंटर मधून रुग्ण लवकरात लवकर बरा होवून घरी परतावा यासाठी मोफत सर्व चांगल्या सुविधा मिळणार आहेत, असे प्रतिपादन प्रांत संघचालक नानासाहेव जाधव यांनी केले.

नगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघ, जनकल्याण समिती, हिंद सेवा मंडळ व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी गृहाच्या वास्तूत सुरु करण्यात आलेल्या केशव – माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण भारतमाता प्रतिमेच्या पूजनाने झाले. यावेळी मनापा आयुक्त शंकर गोरे, उपयुक्त यशवंत डांगे, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, संचालक मधुसूदन सारडा, डॉ.पारस कोठारी, अॅड. सुधीर झरकर, भैय्या गंधे, रवींद्र बारस्कर, सेंटरचे प्रमुख राजेश परदेशी, रणजीत श्रीगोड, श्रीकांत जोशी, जिल्हा कार्यवाह डॉ. मनोहर देशपांडे, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी आदी उपस्थित होते.

प्रा. शिरीष मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी गृहाच्या नूतन वास्तूत संघाचे कोविड सेंटर सुरु होण्यासारखे मोठे कार्य नाही. आज देशात संघाचे अतुलनीय काम चालू आहे. या कार्यात हिंद सेवा मंडळाला खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मिळाले आहे.

संजय जोशी म्हणाले, शैक्षणीक कार्याबरोबरच सामाजिक कार्याला हिंद सेवा मंडळ कायम चालना देत आहे. मागच्या वर्षीही संस्थेच्या अनेक वास्तूंमध्ये कोविड केअर सेंटर सुरु झाले होते. या पुढील काळातही सामाजीक उपक्रमांना मदत करण्याची ग्वाही देतो.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा रा.स्व.संघ समाजाच्या मदतीला धावून जातो. सध्याच्या परिस्थितीत मोफत कोविड केअर सेंटर सुरु करून येथे मोठे सेवा कार्य्झाले आहे. अशा अनेक उपक्रमांना महापालिकेचे कायम सहकार्य असते.

प्रास्ताविकात हिराकांत रामदासी यांनी कोविड केअरची माहिती देताना सांगितले, याठिकाणी करोना बाधित रुग्णांना मोफत निवास, भोजन व इतर सुविधा मिळणार आहेत. रुग्णां कडून  व्यायाम, प्राणायाम करून घेण्या बरोबरच  व मानसिक स्वास्थ्यासाठी धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सेंटरचे सहप्रमुख पी.डी.कुलकर्णी यांनी केले. प्रमुख राजेश परदेशी यांनी आभार मानले. कोविड सेन्टरच्या अधिक माहितीसाठी 8446376575  या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment