जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरची पाहाणी करताना आमदार निलेश लंके. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 4, 2021

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरची पाहाणी करताना आमदार निलेश लंके.

 नगरी दवंडी


जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरची पाहाणी करताना आमदार निलेश लंके.नगरी दवंडी

निघोज प्रतिनिधी - दि.४ मे

संदीप पाटील आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून जनसेवेचे काम होउन कोरोना रुण्गांना बरा होण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने सूरू करण्यात आलेल्या संदीप पाटील आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.१०० बेडच्या या कोव्हिड सेंटरमध्ये ५० बेड ऑक्सिजन सुविधेचे असून अद्ययावत कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सुविधा युक्त असल्याने या परिसरातील कोरोना रूण्गांना मोठा आधार मिळणार आहे.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश लाळगे,निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी डोणे,  गायकवाड सिस्टर

संदीप पाटील जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे,पप्पुशेठ जासुद,दिपक काटे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे,सुनिल पवार,बाबाशेठ लंके, बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंगेश लंके, उत्तमराव लामखडे अस्लमभाई इनामदार संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य, संदीप पाटील वराळ युवामंचचे सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार लंके यावेळी म्हणाले संदीप पाटील जनसेवा फौंडेशनचे सदस्य सामाजिक सेवेत सातत्याने अग्रभागी असतात सचिन पाटील वराळ व त्यांचे सर्व सहकारी या कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून जनसेवेचे पुुण्यकर्म

  करीत माणसातील देवाची सेवा करणार असून आपण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या कोव्हिड सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार लंके यांनी या वेळी दिली.सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यावेळी म्हणाल्या आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून जनसेवेचे मोठे काम केले असून खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व आमदार निलेश लंके यांची प्रेरणा आशिर्वाद व पाठबळ घेउन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनने व निघोज ग्रामस्थ यांनी नियोजन केलेल्या संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरमध्ये मानवी सेवेच्या माध्यमातून ईश्वरी सेवा होणार असल्याची ग्वाही सरपंच वराळ यांनी बोलताना दिली आहे.पहील्याच दिवशी या कोव्हिड सेंटरमध्ये १८ रुण्ग दाखल झाले असून निघोज व परिसरात कोरोना रुण्गांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे कोव्हिड सेंटर रुण्गांना आधार देणारे ठरणार असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व संदीप पाटील युवामंच माध्यमातून शेंकडों कार्यकर्ते सक्रिय असून गेली वर्षभरात सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी अल्प दरात किराणा, भाजीपाला व औषध घरपोच केली आहेत तसेच कोरोना काळात रुण्गांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम करीत सेवाभाव केला आहे या संदीप पाटील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष कोरोना रुण्गांची सेवा करण्याचे भाग्य लाभले असल्याची प्रतिक्रिया संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य व संदीप पाटील वराळ युवामंचचे सदस्य यांनी  बोलताना व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here