‘तौक्ते’ मुंबईत दाखल वार्‍यासह जोरदार पाऊस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

‘तौक्ते’ मुंबईत दाखल वार्‍यासह जोरदार पाऊस

 ‘तौक्ते’ मुंबईत दाखल वार्‍यासह जोरदार पाऊस


मुंबई ः
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईत काही भागात पाणी साठलं आहे. मुंबईत दादर, हिंदमाता परिसरासह अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येत असल्याने मुंबई महापालिकेने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे वरळी सीलिंक सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. बाहेर पडण्याचा विचार करत असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत आणि पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनार्‍यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही हे पाहण्याच्याही सूचना दिल्या.
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here