निर्बंध असताना दुकाने उघडली 8 दुकाने 1 महिन्यांसाठी सील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

निर्बंध असताना दुकाने उघडली 8 दुकाने 1 महिन्यांसाठी सील

 निर्बंध असताना दुकाने उघडली 8 दुकाने 1 महिन्यांसाठी सील

मनपा व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेने काल अचानकपणे नगर शहरामध्ये पुन्हा निर्बंध घालून अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आज ज्यांनी दुकाने उघडली त्यांची एक महिन्यासाठी दुकाने सील करण्यात आले असून यामध्ये आठ दुकानांचा समावेश आहे महानगरपालिका व कोतवाली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरामध्ये ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे विनाकारण मोकाट फिरत आहे अशांवर सुद्धा अँटी जेल चाचणी यावेळी करण्यात आली.
काल महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी अचानक पणे मुलगा शहरातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक पाहता कालपासूनच सर्व व्यवहार सात ते अकरा या कालावधीमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, काल रात्री आठच्या सुमाराला नवीन आदेश काढून त्यांनी आजपासून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि व्यापार्‍यांना याची कल्पनासुद्धा नव्हती सकाळीच व्यापारी हे आपापली दुकाने उघडण्यासाठी शहरांमध्ये आलेली होती व त्यांनी आपला व्यवहार सुरू करत असताना दुसरीकडे शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे व कोतवाली यांच्या पथकाने तसेच महानगर पालिकेच्या पथकाने आज सकाळपासून धडाकेबाज कारवाई सुरू केली नगर शहरातील दुकाने उघडी ठेवली होती त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली तर आज दुकानांना एक महिन्यासाठी सील करण्यात आले होते या कारवाईमुळे शहरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला होता, जर महानगरपालिकेला एवढेच वाटत होते तर त्यांनी किमान एक दिवसाची मुदत अगोदर देणे आवश्यक होते मात्र तसे न करता अचानक पणे केलेली कारवाई ही निंदनीय आहेत असेही बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here