उद्योजक नवनाथ सोबले यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल पारनेरकर मानतात आभार....! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

उद्योजक नवनाथ सोबले यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल पारनेरकर मानतात आभार....!

 रात्री अपरात्री कोरोना रुग्णांना मदत तर कोव्हीड सेंटरला अन्नदान करून "ते" उद्योजक जपतात सामाजिक बांधिलकी....

उद्योजक नवनाथ सोबले यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल पारनेरकर मानतात आभार....!



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

सामाजिक उत्तरदायित्व घेण्यास उद्योजक नवनाथ सोबले यांचे मोलाचे कार्य पारनेर शहरात पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सुरू केलेला कॉविड सेंटरमधील रुग्णांना संपूर्ण एक दिवस अल्प उपहार ते मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था उद्योजक नवनाथ सोबले यांनी केली होती  तसेच पारनेर शहरातील वार्ड क्रमांक १ व ४ मधील नागरिकांची ऑक्सी मीटरद्वारे व टेंपरेचर मीटरद्वारे नवनाथ सोबले  यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन तपासणी केलेली आहे व करत आहे. तसेच आपल्या स्वतःचे मालकीचे असणाऱ्या दोन गाड्या ह्या वार्ड क्रमांक १ व वार्ड क्रमांक ४ मधील जनतेच्या सेवेसाठी, नागरिकांना कोरोना टेस्ट करणे,वैद्यकीय उपचारासाठी  दवाखान्यात ये-आण करणे,करीता वैद्यकीय उपचार  घेतल्यानंतर नागरिकांना कोविड सेंटर मधुन घरापर्यत सोडवणे यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ज्या वेळेस नागरिकांचा काही त्रास जाणवत असल्याचा फोन आलाच तर रात्री-अपरात्री ही किंवा इतर वेळेत नवनाथ सोबले स्वतः जाऊन ऑक्सिमीटर व टेंपरेचर मीटरद्वारे स्वतः तपासणी करतात आणि लगेच वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यामध्ये घेऊन जातात या कार्यामुळे नवनाथ सोबले यांचे वार्ड क्रमांक १ व ४ मधील जनतेकडून आभार मानले जात आहेत. तसेच  कोरोना सारख्या परिस्थितीत जवळची माणसं दुरावली जात असताना नवनाथ सोबले यांनी दिलेला आपलेपणाचा व माणुसकीचा आधार नागरिकांना भावनिक करत आहे.

No comments:

Post a Comment