उद्योजक दादा कावरे यांचे कोविड सेंटरमध्ये अन्नदान व दीड लाख रुपयांची मदत.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

उद्योजक दादा कावरे यांचे कोविड सेंटरमध्ये अन्नदान व दीड लाख रुपयांची मदत..

 उद्योजक दादा कावरे यांचे कोविड सेंटरमध्ये अन्नदान व दीड लाख रुपयांची मदत..



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या बाधितांना अन्नदान करून स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय पारनेर येथील बुगेवाडी येथील उद्योजक दादा कावरे यांनी घेतला आहे. पारनेरजवळील बुगेवाडी येथे सध्या कोरोनाबाधित रुग्ण काही प्रमाणात आहेत. त्यातील अनेक रुग्ण आमदार नीलेश लंके यांनी भाळवणीत उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये विलगीकरणामध्ये आहेत. यावेळी बुगेवाडी येथील युवक दादाभाऊ कावरे यांनी स्वतः दररोज आठ दिवस अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या वाढदिवसापासून सुरुवात करून आठ दिवस दररोज कोविड सेंटरमध्ये अन्नदान केले आहे. आता या महिन्यात ज्या युवकांचा वाढदिव असेल त्यातील युवक अशा पद्धती उपक्रम राबवणार आहेत. लंके यांनी दादाभाऊ कावरे व बुगेवाडीमधी युवकांचे कौतुक केले. यावेळ दादाभाऊ कावरे, भाऊ कावरे, उद्योजक नवनाथ सोबले, सुनील म्हस्के, गोटू कावरे  उपस्थित होते.

आमदार नीलेश लंके यांनी सामाजिक भावना म्हणून कोविड सेंटर उभे केले. त्यास आमचा हातभार लागावा म्हणून आम्ही आठ दिवस अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दादाभाऊ कावरे उद्योजक डि.के. लॉजिस्टिक

No comments:

Post a Comment